सोसायटी थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार; सहाय्यक निबंधकांकडून नोटिसा

आण्णासाहेब बोरगुडे
Wednesday, 23 September 2020

अधिनियम १९६० वनियम १९६१ चे कलम ७३ क अ (अ) व ब मधील तरतुदीचे उल्लंघन केलेले असल्याने अशा संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२० रोजी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कायदेशीर कारवाईचे संकेतही नोटिसीद्वारे देण्यात आले आहे.

नाशिक : (निफाड) वेळेत कर्जफेड न केल्याने तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार तयार झाली आहे. थकबाकीमुळे सहाय्यक निबंधकांकडून निफाड तालुक्यातील संचालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ३० सप्टेंबरला थकबाकीदार संचालकांना लेखी खुलासा करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत नोटिसांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्यामुळे आता थकबाकीदार संचालकांवर पद वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. 

नोटिसीद्वारे कायदेशीर कारवाईचे संकेत...

निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अनेक संचालकांनी त्या त्या संस्थेकडून अल्प मुदत व मध्यम मुदतीत कर्ज घेतले असून, दिलेल्या मुदतीत कर्ज फेड न केल्याने आता निफाडच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून थकबाकीदारांना नोटीस बजावित कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. थकबाकी ठेवल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० वनियम १९६१ चे कलम ७३ क अ (अ) व ब मधील तरतुदीचे उल्लंघन केलेले असल्याने अशा संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२० रोजी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कायदेशीर कारवाईचे संकेतही नोटिसीद्वारे देण्यात आले आहे.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

कार्यक्षेत्रातील बाजार समितीचे निवडणुकीसाठी, तसेच गावातील स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी सोसायटी संचालकांचे पद व मत अतिमहत्त्वाचे असल्याने थकबाकीदार संचालकांची पद वाचविण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे.  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sword of disqualification hanging over the arrears directors of the society nashik marathi news