"छत्रपतींच्या नावाने अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करा"; छावा संघटनेची मागणी

प्रमोद दंडगव्हाळ
Tuesday, 8 September 2020

छत्रपतींच्या नावाने अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करा तसेच त्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाची दखल घ्या.. याबाबत छावा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
     

नाशिक : छत्रपतींच्या नावाने अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करा तसेच त्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाची दखल घ्या.. याबाबत छावा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
     

छत्रपती ही अखंड हिंदुस्थानाची प्रतिमा

छत्रपती ही अखंड हिंदुस्थानाची प्रतिमा आहे, तमाम शिवभक्तांचे आराध्य दैवत आहे. परंतु काही अमली पदार्थ उत्पादन करणारे उत्पादक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून मादक पदार्थांचे उत्पादन करून त्याची बाजारात विक्री करत आहेत. हे पटण्यासारखे नाही व अतिशय खेदाची बाब आहे. या संदर्भात बऱ्याच प्रकारची आंदोलने झाली तरी देखील आजमितीला या उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर कारवाई झालेली नाही.
या संदर्भात शिवधर्म फाऊंडेशनचे किल्ले पुरंदर येथे चालू असलेल्या आंदोलनास छावा क्रांतिवीर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे.

छत्रपतींच्या अस्मितेसाठी उदासीनता हे योग्य नाही

गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन चालू असून यातील काही आंदोलकांची प्रकृती देखील खालावली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तरी देखील सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणीही सदर आंदोलनाची देखील घेतली नाही. निवडणूक काळात छत्रपतींच्या नावाने राजकारण आणि ज्यावेळी छत्रपतींच्या अस्मितेचा प्रश्न येतो त्यावेळी असलेली उदासीनता हे योग्य नाही.याबाबत यग्य कारवाही होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

उत्पादकांच्या विरोधात तात्काळ कारवाईचा प्रस्ताव
संघटनेच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की चालू असलेल्या अधिवेशनात याबाबत सत्ताधारी व विरोधक यापैकी कोणीही प्रस्ताव न मांडल्यास आपण फक्त राजकारणासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर करत असल्याचे समजण्यात येईल. त्यामुळे आपण या उत्पादकांच्या विरोधात तात्काळ कारवाईचा प्रस्ताव किंवा विधेयक मांडून तो बहुमताने मंजूर करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा.अन्यथा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात लोक प्रतिनिधींच्या घरासमोर जन आंदोलन उभे केले जाईल व होणाऱ्या परिणामास संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल अशा प्रकारच्या इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक उमेश शिंदे, जिल्हाध्यक्ष विजय खर्चून, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सागर पवार, युवा आघाडी उपजिल्हाप्रमुख गणेश ढिकले, आयटी जिल्हाप्रमुख शुभम देशमुख दत्ता हराळे, युवक शहराध्यक्ष वैभव दळवी आदी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take action against drug dealers in the name of Chhatrapati nashik marathi news