"च्यवनप्राश घ्या, तंदुरूस्त व्हा..आणि जरा कोरोना आटोक्यात आणा.." मनसेकडून महापौरांना उपहासात्मक संदेश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

महापौर च्यवनप्राश घ्या, तंदुरूस्त व्हा आणि शहरात फिरून कोरोना आटोक्यात आणा, अशा मागण्या करण्यात आल्या. सत्ताधारी भाजपला कोरोनाला नियंत्रणात आणता आले नाही, याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला.

नाशिक ः  सत्ताधारी भाजपला कोरोनाला नियंत्रणात आणता आले नाही, याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट देत फीट राहा असा उपहासात्मक संदेश देण्यात आला.

कोरोना नियंत्रणात आणता आला नाही ना..मग च्यवनप्राश घ्या, तंदुरूस्त व्हा..

हॉटस्पॉट भागात भेटी देऊन कोरोना नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संदीप भंवर यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या रामायण निवासस्थानी निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर सत्ताधारी भाजपला नियंत्रणात आणता आले नाही. महापौर शहरात कुठेही भेट देत नाही. त्यामुळे मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. महापौर च्यवनप्राश घ्या, तंदुरूस्त व्हा आणि शहरात फिरून कोरोना आटोक्यात आणा, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात कौशल पाटील, सौरभ सोनवणे, जावेद शेख आदी सहभागी झाले होते. 

हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take Chyavanprash get fit MNS presents to the Nashik Mayor nashik marathi news