नाशिकच्या विद्यार्थ्यांना शिकविणार दिल्लीतील शिक्षक; फीअभावी शिक्षण थांबलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा 

online education.jpg
online education.jpg

नाशिक : देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या दिल्लीतील सरकारी शाळांतील प्रयोगशील शिक्षक आता नाशिकमधील वंचित आणि अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणार आहेत. यासोबतच शहरातील काही सुजाण आणि सुशिक्षित नागरिक, निवृत्त शिक्षक आणि आम आदमी पक्षाशी संबंधित शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्तेही दिवसातील काही वेळ शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविणार आहेत. 
शहरात काही खासगी शाळांनी पालकांकडे फी वसुलीचा तगादा लावत ४ जानेवारीपूर्वी फी न भरल्यास पाल्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याच्या नोटिसा व्हॉट्सअॅपद्वारे बजावल्या आहेत. 

नाशिकच्या विद्यार्थ्यांना दिल्लीतील शिक्षक शिकविणार 
कोरोनामुळे अनेकजण बेरोजगार झाले, अनेकांचे पगार निम्म्‍यावर आले, अशा पालकांना खासगी शाळांची भरमसाठ फी भरणे अवघड असल्याने अशा शाळांनी वेठीस धरलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या दिल्ली सरकारच्या शाळांतील शिक्षक शिकविणार आहेत. आम आदमी पक्षाच्या पुढाकारातून हे शिक्षण दिले जाणार आहे. 

फीअभावी शिक्षण थांबलेल्या विद्यार्थ्यांना आम आदमी पक्षाचा दिलासा ​
आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे म्हणाले, की शुल्कासाठी खासगी शाळा पाल्यांना वेठीस धरत असतील, तर अशा आर्थिकदृष्ट्या अन्यायग्रस्त पालकांनी आम आदमी पक्षाकडे संपर्क साधावा. त्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त आणि दर्जेदार शिक्षकांकडून ऑनलाइन शिक्षण देण्याची व्यवस्था नाशिक शहरात उभी करत आहोत. दहावीतील मुलांसाठी विशेष प्रयत्न करून १७ नंबरच्या फॉर्मद्वारे त्यांच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पक्षाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पालकांनी शाळांच्या धमक्या किंवा दबावाला बळी न पडता विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आम आदमी पक्षाशी संपर्क साधावा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com