मनात निश्चय..दहा किलोमीटवरील कॉलेजचा प्रवास...तेजस्वीनीची धडपड वाखणण्याजोगी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

महामार्गावरून जाणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी शासकीय विश्रामगृहात थांबून विविध विषयांवर होणाऱ्या बैठका, अधिकारीवर्गाचा रुबाब व कार्य पद्धती कुतूहलाने पाहत असलेल्या तेजस्विनीला अधिकारी होऊन खऱ्या अर्थाने बदल घडवता येऊ शकतो, अशी आशा मनात ठेवून सकाळी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाविद्यालयात मिळेल त्या वाहनाने जात शिक्षण घेत.

नाशिक / झोडगे : महामार्गावरून जाणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी शासकीय विश्रामगृहात थांबून विविध विषयांवर होणाऱ्या बैठका, अधिकारीवर्गाचा रुबाब व कार्य पद्धती कुतूहलाने पाहत असलेल्या तेजस्विनीला अधिकारी होऊन खऱ्या अर्थाने बदल घडवता येऊ शकतो, अशी आशा मनात ठेवून सकाळी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाविद्यालयात मिळेल त्या वाहनाने जात शिक्षण घेत. त्यानंतर...

अभ्यास व परिश्रम हाच राजमार्ग

राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव ते झोडगेदरम्यान चिखलओहळ येथील सतीश अहिरराव या पदवीधर अल्पभूधारक शेतकऱ्याची तेजस्विनी ही मोठी मुलगी असून, अहिरराव कुटुंब आपली महामार्गालगत असलेल्या शासकीय विश्रामगृहाशेजारी असलेल्या शेतीवर राहून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. महामार्गावरून जाणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी शासकीय विश्रामगृहात थांबून विविध विषयांवर होणाऱ्या बैठका, अधिकारीवर्गाचा रुबाब व कार्य पद्धती कुतूहलाने पाहत असलेल्या तेजस्विनीला अधिकारी होऊन खऱ्या अर्थाने बदल घडवता येऊ शकतो, अशी आशा मनात ठेवून सकाळी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाविद्यालयात मिळेल त्या वाहनाने जात शिक्षण घेत.

कृषी क्रांती घडविण्यासाठी हातभार लावण्याची इच्छा

अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चिखलओहळ येथील तेजस्विनी अहिरराव हिने बारावीत ७९.२३ टक्के गुण मिळवून जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळाला. तेजस्विनीला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होऊन कृषी क्षेत्रात, शेती सिंचन, कृषीप्रक्रिया उद्योगासाठी भरीव कामगिरी करून कृषी क्रांती घडविण्यासाठी हातभार लावण्याची इच्छा आहे. 

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

घरी आई-वडिलांना शेतीकामात मदत करून रात्री शालेय शिक्षण घेणाऱ्या लहान बहीण, भावाचा अभ्यास घेताना आपलाही अभ्यास करीत असलेल्या तेजस्विनीला वाचनाची आवड आहे. विविध घडामोडींचा आढावा घेऊन वर्तमानपत्रात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असलेली माहिती आवर्जून वाचन करीत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास व परिश्रम हाच राजमार्ग असल्याची भावना व्यक्त केली.  

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswini who has passed 12th standard wants to achieve in the field of agriculture nashik marathi news