लॉकडाऊनमधील घटनेचा गुन्हे शोध पथकाने लावला छडा! अल्पवयीन बालकांच्या मदतीने तरुणांचा बिर्याणी हॉटेलमध्ये 'कारनामा'

theft bhandi.jpg
theft bhandi.jpg

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे हॉटेल ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होते. त्याच लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान दोघा अल्पवयीन बालकांच्या मदतीने दोन तरुणांनी धक्कादायक कारनामा केला. त्या घटनेचा आता गुन्हे शोध पथकाने छडा लावला आहे.

लॉकडाऊनमधील घटनेचा गुन्हे शोध पथकाने लावला छडा! 

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड शेजारी महाराष्ट्र दरबार बिर्याणी हे हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे ते बंद असताना (ता. 23 मार्च ते ता. 27 ऑगस्ट) दरम्यान ही घटना घडली होती. शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड शेजारी महाराष्ट्र दरबार बिर्याणी हे हॉटेल आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे हॉटेल ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होते. संशयित राहुल संजय तुरे हा वेटर म्हणून कामाला होता.  याच कालावधीत संशयित तुरे याने त्याचा साथीदार शिवा राजू उफाडे तसेच अन्य दोघा अल्पवयीन बालकांच्या मदतीने हॉटेलचा पत्रा उचकावून प्रवेश करत धातूची पातेले संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे असा ऐवज चोरुन नेला होता.

नोकराचीच मित्रांच्या साहाय्याने चोरी

या संदर्भात हॉटेलचे व्यवस्थापक अश्रफ नजीर मनियार (रा.सिडको) यांनी 12 सप्टेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या चोरीच्या घटनेत हॉटेलमधील सात पितळी पातेले, एक कॉम्प्युटर व प्रिंटर, इन्व्हटर व चार बॅटरी आणि दोन सीसीटीव्ही कॅमेरे अशी चोरी झाली होती. याचा तपास सुरू असताना पंचवटी गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली की, हॉटेलमधील नोकरानेच मित्रांच्या सहाय्याने चोरी केल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास सुरु केला होता.    

असे सापडले चोर

संशयिताच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळाला त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत संशयिताला नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. 

हॉटेलचा पत्रा उचकटून चोरी

लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान पेठरोडवरील एका हॉटेलचा पत्रा उचकटून हॉटेलमध्ये चोरी करण्यात आली होती. या चोरीचा पंचवटी गुन्हे शोध पथकाने छडा लावला आहे. पथकातील बाळनाथ ठाकरे, विजय मिसाळ, सागर कुलकर्णी, आनंद चौधरी, किरण सानप, राकेश शिंदे, विलास चारोस्कर आदींनी सापळा रचून त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही हुडकून काढले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही अल्पवयीन मुलांची माहिती दिली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयितांकडून चोरीस गेलेल्या साहित्यापैकी सात पितळी पातेले हस्तगत करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com