कांदे रोपांवर चोरट्यांची वक्र दृष्टी! चापडगावला उन्हाळ कांदा रोपांची चोरी, शेतकरी भयभीत

summer onion theft.jpg
summer onion theft.jpg

सिन्नर (जि.नाशिक) : तालुक्यातील चापडगाव येथील  प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे शेतातील उन्हाळ कांद्याचे रोप अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे. कांदे रोपावर चोरट्यांची वक्र दृष्टी पडली आणि हा प्रकार घडला.

कांदे रोपावर चोरट्यांची वक्र दृष्टी

चापडगाव शिवारात किरण गांगड यांनी वाट्याने उन्हाळ कांद्याचे रोप केले आहे. हे रोप लागवडी योग्य झाल्याने पाऊस थांबल्यावर शेत तयार करून लागवड करण्यात येणार होती. परंतु या कांदे रोपावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली. सुमारे दोन किलो बियाणाचे रोप चोरट्यांनी लंपास केले. या रोपाची बाजारात किंमत सुमारे दहा हजार रुपये इतकी आहे. हे रोप बनवण्यासाठी मजुरी, खत,औषधे यासाठी अतिरिक्त ३ हजार रुपये खर्च आला होता. चोरीच्या या घटनेत शेतकऱ्याचे १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरात अति पावसाने कांदा रोपे सडली असून अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवण झाले नाही.

शेतकरी भयभीत

त्यामुळे तयार कांदा रोपाला प्रचंड मागणी असून किमती देखील वाढल्या आहेत. परिसरात रोप चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे शेतात येउन रोप उपटून नेत असल्याने या रोपांच्या राखणीसाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी थेट शेतात रात्रीचा मुक्काम करत असल्याचे चित्र आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com