भाविकांच्या रांगेचा घेतला फायदा; महिला भाविकाच्या मंगळसुत्र आणि पैशांवर डल्ला

devotees crime.jpg
devotees crime.jpg

नाशिक : यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील सर्वच देवी मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. यानंतर भाविक श्रध्देपोटी देवी मंदिरांच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून दर्शन घेत होते. याचाच फायदा घेत धक्कादायक घटना घडली आहे.

भाविकांच्या रांगेचा घेतला फायदा; महिला भाविकाच्या मंगळसुत्र आणि पैशांवर डल्ला

नवरात्रोत्सवाच्या अष्टमी-नवमीनिमित्त शुक्रवारी (दि.२३) गंगाघाट येथील सांडव्यावरच्या देवीचे रस्त्यावर उभे राहून घेत होते. यावेळी देवी मंदिरांसमोर भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी महिलांची संख्या जरा अधिक पाहायला मिळाली. अशातच सांडव्यावरच्या देवीचे दर्शन घेत असलेल्या भाविकांच्या रांगेत फिर्यादी पुष्पा परशराम (३५,रा. रोहिणीनगर, पंचवटी) यादेखील उभ्या होत्या. यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या पाठीमागे उभे राहत पर्सची चैन उघडून त्यामध्ये ठेवलेली दहा हजारांची रोकड, तसेच १० हजाराचे मंगळसुत्र लांबविल्याचे  निदर्शनास आले.

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दर्शन घेत असलेल्या एका महिला भाविकाच्या पर्समधील दहा हजाराची रोकड व मंगळसुत्र भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने भाविकांच्या रांगेचा फायदा घेत गायब केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर महिलेनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com