ओझरला पोलिसांकडून कत्तलखान्याचा भांडाफोड; तेरा जणांना अटक

crime.jpg
crime.jpg

नाशिक : ग्रामीण पोलिसांनी रविवारी (ता. १७) पहाटे ओझरला चांदणी चौकात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टोळीवरील कारवाई करीत, सहा जनावरे, गोवंश जनावरे मांस आणि वाहन असा सुमारे दहा लाखांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी सायंकाळपर्यंत एका कत्तलखान्यावर कारवाई करीत तेरा जणांना पोलिसांनी अटक केली.

तेरा जणांना अटक

ओझरला पोलिसांनी पहाटे केलेल्या कारवाईत पिक-अप वाहनाची झडती घेताना पोलिसांना पिक-अप (एमएच १५, एफव्ही ३९३३)मध्ये कोंबून चालविलेली सहा जनावरे जप्त केली. त्यात, जावेद इस्माईल सय्यद (सय्यदपिंप्री, ता. नाशिक), खलील हाजी कुरेशी, जुबेर कुरेशी (दोघेही ओझर), नवल गाडे (चितेगाव, ता. निफाड) या चौघांना अटक केली.

कत्तलखान्याचा भांडाफोड

ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयितांच्या चौकशीत यात ओझर गावातील चांदणी चौकातील एका कत्तलखान्याची उकल झाली. चांदणी चौकात कत्तलखान्यात पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे दोन गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल झाल्याचे पोलिसांना आढळले. त्यात पोलिसांनी एक हजार ९०० किलो मांस हस्तगत करीत, सलीम सुलतान कुरेशी, जौदिश सुलतान कुरेशी, एजाज इसाक कुरेशी, इस्तियाक इसाक कुरेशी (सर्व जण ओझर), मुज्जमील नुरोद्दीन शेख, हबीब युसूफ शेख, (दोघेही वडाळा गाव, नाशिक), कय्युम सुलतान कुरेशी, अन्वर सुलतान कुरेशी, फारूक सुलतान कुरेशी (सर्व जण ओझर) यांना अटक केली.

सुमारे दहा लाखांचा ऐवज हस्तगत

गोवंश वाहतूक प्रकरणी एक पिक-अप, एक ओम्नी व्हॅन, एक इस्टिम कारसह सुमारे दहा लाखांचा ऐवज हस्तगत केला. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर आहीरराव, सागर शिंपी आदींच्या पथकाने कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com