VIDEO : जिद्दीला सलाम! दिव्यांग तरुणाच्या प्रयत्नातून तीस जणांना रोजगार; निर्माण केले स्वतःचे साम्राज्य

akash kandil.jpg
akash kandil.jpg

नाशिक : अनेक जण दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी लहान-मोठ्या ठिकाणी नोकरीसाठी उंबरठे झिजवावे लागतात. परंतु जिद्द असली तर कोणाचेही पाय न धरता कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झेप घेता येते, हे येथील दिव्यांग तरुणाने दाखवत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. 

राज्याच्या विविध भागांतूनही आर्डर

जुन्या नाशिकमधील तिवंधा परिसरात संतोष सोळसे हा दिव्यांग युवक सहकुटुंब वास्तव्यास आहे. सुरवातीची काही वर्षे कापड दुकानात नोकरी केल्यानंतर लग्न झाले. कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगी व दोन मुले अशी तीन फुले उमलली. स्वतःसह पत्नी व तीन मुलांच्या प्रापंचिक गरजा भागविताना अडचणी येऊ लागल्या. त्यातच स्वतःमधील सुप्त कलाकार स्वस्थ बसू देईना. याच काळात बैलगाडी, विमाने तयार करून विकण्यास सुरवात केली. साधारण १२ वर्षांपूर्वी एका मित्राच्या सल्ल्याने दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील बनविणे सुरू केले. सुरवातीला केवळ नाशिक शहरातील विक्रेत्यांच्या आर्डर स्वीकारत असल्याचे संतोष सोळसे यांनी सांगितले. कालांतराने मुंबईसह राज्याच्या विविध भागांतूनही आर्डर सुरू झाल्या. 

जिद्दी दिव्यांग तरुणाच्या प्रयत्नातून तीस जणांना रोजगार 

सुरवातीला केवळ घरातील पाच जणच या व्यवसायावर अवलंबून होते, कालांतराने व्यवसाय वाढू लागल्यावर माणसांची गरज निर्माण झाली. श्री. सोळसे यांच्याकडे सध्या त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह तब्बल ३० जण आकाशकंदील बनवितात. म्हणजेच त्यांनी तब्बल तीस जणांना या व्यवसायातून रोजगार निर्माण करत समाजापुढेही आदर्श ठेवला आहे. खरेतर दिवाळीपूर्वी दोन महिने आधी तेजी येते, परंतु यासाठी वर्षभर तयारी करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तर रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत आकाशकंदील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. या व्यवसायात दोन ते अडीच लाखांची गुंतवणूक करावी लागते. आकाशकंदिलासाठी चटई, पुठ्ठा, लेस, गम, स्टिक असा इकोफ्रेंडली कच्चा माल वापरला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

आयएएसचे स्वप्न 

श्री. सोळसे कुटुंबात त्यांच्यासह दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे. त्यांची तिन्ही अपत्ये सध्या त्यांना व्यवसायात मदत करतात. त्यांची मुलगी कला शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत असून, तिचे आयएएस होण्याचे स्वप्न आहे. यासाठी ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आयएएस होऊन लहानपणापासून कष्ट करत असलेल्या दिव्यांग वडिलांसह आईच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने आनंद पाहायचा आहे, असे तिने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com