जिल्ह्यात प्रथमच हजारावर कोरोनाबाधित.. आरोग्‍य यंत्रणेपुढे आव्‍हान निर्माण

अरुण मलाणी
Tuesday, 4 August 2020

 जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अधिक गतीने होऊ लागला असून, सोमवारी (ता. ३) प्रथमच एकाच दिवशी एक हजार २६ कोरोनाबाधित आढळल्‍याने आरोग्‍य यंत्रणेपुढे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्‍हान निर्माण झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अधिक गतीने होऊ लागला असून, सोमवारी (ता. ३) प्रथमच एकाच दिवशी एक हजार २६ कोरोनाबाधित आढळल्‍याने आरोग्‍य यंत्रणेपुढे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्‍हान निर्माण झाले आहे. त्यातच, अकरा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्याने कोरोनाबळींची संख्याही ५३३ वर पोचली आहे.

दिवसभरात आढळले एक हजार २६ रुग्ण, अकरा जणांचा मृत्यू 

दरम्यान, दिवसभरात २०८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत ११ हजार ७८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ६४९ वर पोचली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत एक हजार रुग्‍ण वाढीकरिता सरासरी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत होता. परंतु, आता रुग्‍णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

बरे झालेल्‍यांचा आकडा

सोमवारी नव्‍याने आढळलेल्‍या रुग्‍णांमध्ये तब्‍बल ८८४ रुग्‍ण नाशिक शहरातील असून, ग्रामीण भागातील १२०, तर मालेगाव महापालिका हद्दीतील २२ रुग्ण आहेत. मृत्‍यू झालेल्‍या अकरा रुग्‍णांमध्ये शहरातील पाच, ग्रामीणमधील पाच, तर मालेगावच्‍या एका रुग्णाचा समावेश आहे. शहरात सिडकोतील ७५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, सावतानगर येथील ८५ वर्षीय महिला, पेठ रोडवरील ६४ वर्षीय पुरुष, नाशिक रोड परिसरातील ४१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर, ग्रामीण भागात भगूर येथील २८ व ७५ वर्षीय पुरुष, इगतपुरीतील ५९ व ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मालेगावच्या भावसार गल्‍लीतील ७० वर्षीय पुरुष रुग्‍णाचाही कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. बरे झालेल्‍या २०८ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १५७, नाशिक ग्रामीणचे ४०, तर मालेगावच्‍या ११ रुग्‍णांचा समावेश आहे. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

शहरातील मृतांची संख्या तीनशेवर 
शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, मृतांचा आकडादेखील वाढत आहे. शहरात आतापर्यंत ११ हजार २१८ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्‍यापैकी सात हजार ७४३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तब्‍बल तीनशे रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. तीन हजार १२९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत केलेल्‍या चाचण्यांमध्ये शहरातील २८ हजार ७०२ रुग्‍णांचा अहवाल निगेटिव्‍ह आलेला आहे. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ
 
दिवसभरात ९०९ संशयित आढळले 
सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ९०९ संशयित आढळून आले. यापैकी ६५९ नाशिक शहरातील असून, १७४ नाशिक ग्रामीण, ११ मालेगाव, तर ६५ रुग्‍ण गृहविलगीकरणातील आहेत.  

रिपोर्ट - अरुण मलाणी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands corona patients for the first time in district nashik marathi news

टॉपिकस