दुर्देवी! वेगवेगळ्या अपघातांत येवल्यात तीन जण ठार; परिसरात हळहळ

संतोष विंचू
Wednesday, 7 October 2020

सोमवारी (ता. ५) रात्री शहरालगत, तर मंगळवारी (ता. ६) दुपारी राजापूर येथे अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

नाशिक : (येवला) सोमवारी (ता. ५) रात्री शहरालगत, तर मंगळवारी (ता. ६) दुपारी राजापूर येथे अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

अशा आहे घटना

सोमवारी रात्री कोपरगाव येथून पल्सर गाडीने (एमएच १५, एफई ४३८७) येवल्यातील तिघे मित्र येवल्याकडे येत होते. शहराच्या जवळच म्हसोबा मंदिराजवळ मनमाडकडून कोपरगावकडे जाणाऱ्या चारचाकीने (एमएस ४१, ६६०५) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक तेजस सुकदेव आहेर (रा. मोरेवस्ती, पारेगाव रोड) हा जागीच ठार झाला, तर प्रथमेश पुरकर, प्रतीक वाकचौरे गंभीर जखमी झाले. दुसरा अपघात अंगणगाव (ता. येवला) येथे रात्री दहाच्या सुमारास घडला. या अपघातात पालिका कर्मचारी नामदेव सातभाई (वय ५०, रा. शिक्षक कॉलनी, अंगणगाव) हे सोमवारी (ता. ५) रात्री दहाच्या दरम्यान रस्त्याने पायी जात असताना एका वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन ठार झाले.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

तिसरा अपघात राजापूर येथे झाला. येवला नांदगाव रस्त्याने खडी वाहून नेत असलेल्या डंपर (एमएच ४१, एजी ६१११) चालकाचे वाहनावरील ताबा सुटून डंपर ब्रिटिशकालीन पुलावरून खाली पडला. या अपघातात डंपर क्लिनर दीपक सोनवणे (वय २५, रा. चौंडी जळगाव, ता. मालेगाव) येथील तरुण जागीच ठार झाला, तर चालक सोमनाथ मोरे जखमी झाले. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed Accidentally in Yeola nashik marathi news