PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 January 2020

मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव शिवारातील नवव्या मैलाजवळ नाशिकच्या दिशेने टोयोटा करोला कार येत होती. क्षणार्धात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्या कारमध्ये मायलेकी...

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव शिवारातील नवव्या मैलाजवळ नाशिकच्या दिशेने येत असलेल्या टोयोटा करोला कारला सोमवारी (ता. 20) रात्री झालेल्या भीषण अपघातात क्षणार्धात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्या कारमध्ये मायलेकी...

असा घडला प्रकार...

पुणे येथील एरंडवणा भागातील हिमाल सोसायटीत राहणारे शहा कुटुंबीय सोमवारी रात्री मालेगावकडून नाशिकच्या दिशेने टोयोटा करोला कार (एमएच 14, एक्‍स 6301)ने येत होते. रात्री एकच्या सुमारास आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात शेर-ए-पंजाब हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर (आरजे 36, एक्‍स 7578) जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता, की चारचाकीचा चक्काचूर झाला असून, एअर बॅगही फुटल्या आहेत. भरधाव असलेल्या चारचाकीचा स्पीड लॉक होऊन वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

No photo description available.

हेही वाचा > "पप्पा तुम्ही लवकर परत या!" चिमुकल्याची आर्त हाक...काळजाला फोडला पाझर

माय-लेकींचा समावेश; पिता-पुत्र गंभीर जखमी 

अपघातात नीना सागर शहा (वय 44) व संजना सागर शहा (19) या माय-लेकी जागीच ठार झाल्या, तर अत्यवस्थ असलेल्या विद्या बाळू थोरात यांचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेले सागर उत्तमचंद शहा (58) व त्यांचा मुलगा सावन यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बिडगर तपास करीत आहेत. दरम्यान, या अपघातात पिता-पुत्र गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हेही वाचा>  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three women killed in accident near Adgaon Nashik Marathi News