esakal | धोका वाढतोय ... आज पुन्हा दोघे कोरोनाचे बळी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona pic.jpg

सोमवारी (ता.8) दिवसभरात 42 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून यात नाशिकमध्ये 22 तर मालेगावातील 17 रुग्णांचा समावेश आहे. बाधितांमध्ये स्पेनमधून आलेल्या तरुणाचा समावेश आहे. 

धोका वाढतोय ... आज पुन्हा दोघे कोरोनाचे बळी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव, नाशिकमध्ये बाधित रुग्णांमध्ये वाढ 

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येण्याचे कोणतेही चिन्हे नाहीत. निफाडमधील एकासह जुन्या नाशिकमधील नाईकवाडी पुऱ्यातील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यु झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर असून मृतांचा आकडा 99 झाला आहे. तर, सोमवारी (ता.8) दिवसभरात 42 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून यात नाशिकमध्ये 22 तर मालेगावातील 17 रुग्णांचा समावेश आहे. बाधितांमध्ये स्पेनमधून आलेल्या तरुणाचा समावेश आहे. 
जिल्ह्यात सोमवारी (ता.8) रात्री साडेआठ वाजेपर्यंत कोरोनाबाधितांच्या अहवालानुसार, 42 रुग्ण वाढले. यात सर्वाधिक नाशिक शहरात 22 आणि मालेगाव येथे 17 तर, ग्रामीणमध्ये 5 रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरातील जेहान सर्कल परिसरातील रहिवाशी असलेला 20 वर्षीय तरुण गेल्या 31 मे रोजी स्पेन येथून आला. त्यास हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले होते. त्यास कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तरीही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. रविवारी पेठ येथील लोणार गल्लीतील 14 वर्षीय मुलगाही कोरोनाबाधित आढळून आला असून तो नवीन रुग्ण आहे. शिंगाडा तलाव परिसरातील 65 वर्षीय वृद्धाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, द्वारका परिसरातील अमरधाम रोड भागातील 7 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. सिडकोत एक महिला व तरुण पॉझिटिव्ह आले आहेत. तर जुन्या नाशिकमधील नाईकवाडी पुऱ्यात पुन्हा एक 27 वर्षांची महिला बाधित झाली असून, भद्रकालीतील खडकाळी येथे 43 वर्षीय महिला, आझाद चौकातील 65 वर्षीय महिला आणि अजमेरी मस्जीद येथील 69 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली. पंचवटीतील मेरीतील 60 वर्षीय महिला आणि पेठरोडवर आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर नाशिकरोडच्या सुभाषरोड परिसरातील 55 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर देवळाली कॅम्प परिसरात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. 
तसेच, ग्रामीणमध्ये पिंपळगाव बसवंतमध्ये एक, माडसांगवी येथे दोन नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मालेगावमध्ये पुन्हा 17 कोरोनाबाधित आढळून आले. यात 3 व 10 वर्षीय बालकांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 हजार 630 झाला आहे. तर, सध्या 448 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. यात 202 बाधित नाशिक शहरात उपचार घेत आहेत. 

आणखी दोघांचा मृत्यु 
सोमवारी, निफाड तालुक्‍यातील शिरसगाव येथील 55 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यु झाला. त्यांना गेल्या शुक्रवारी (ता.5) जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, शनिवारी (ता. 6) त्यांचा अहवाल कोरोनाबाधित आला. तर सोमवारी (ता. 8) उपचारादरम्यान त्यांचा सकाळी मृत्यू झाला. तसेच नाशिक शहरातील नाईकवाडी पुऱ्यातील कोरोनाबाधित 62 वर्षीय वृद्धाचाही रविवारी (ता.7) रात्री मृत्यु झाला. त्यांना गेल्या शुक्रवारी (ता.5) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघा बाधितांच्या मृत्युमुळे जिल्ह्याचा आकडा 99 झाला आहे.