esakal | क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

ankai killa.jpg

दिवाळीची मौज-मज्जा करायची म्हणून कुटुंबीय आले पर्यटनाला. सगळं काही मस्त सुरु होतं. फोटो सेशनही झालं. मात्र गणेशच्या मागावर काळ होताच. काही मिनिटांतच सगळ्या आनंदावर विरजन...कुटुंबियांना अश्रू अनावर. वाचा काय घडले?

क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (नाशिक) : दिवाळीची मौज-मज्जा करायची म्हणून कुटुंबीय आले पर्यटनाला. सगळं काही मस्त सुरु होतं. फोटो सेशनही झालं. मात्र गणेशच्या मागावर काळ होताच. काही मिनिटांतच सगळ्या आनंदावर विरजन...कुटुंबियांना अश्रू अनावर. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

अनकाई येथील अंकाई-टंकाई किल्ल्यावर २१ नोव्हेंबरला दुपारी पर्यटनासाठी आलेल्या घरातीलच दहा ते बारा जणांच्या समूहातील गणेश आंबरे (वय २२, रा. गणोर, ता. अकोले, जि. नगर) किल्ल्यावर असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेला असता पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईक व मित्रांनी आरडाओरडा केल्याने किल्ल्यावर असलेल्या स्थानिकांना हा प्रकार समजला. पोलिसपाटील संतोष परदेशी यांनी तालुका पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने दोन ते अडीच तासांनंतर रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. 

हेही वाचा > निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख

पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रविवारी (ता. २२) सकाळी विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी हवालदार बाळासाहेब पारखे, संदीप दराडे, गणेश सांगळे, नितीन पानसरे, पोलिसपाटील संतोष परदेशी, राजेशसिंग परदेश, किरण पवार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. 

हेही वाचा > मध्यरात्री रस्त्याजवळ अज्ञातांनी आणला शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसरात खळबळ

go to top