नागरिकांनो वाहतुकीस शिस्त लावा नाहीतर पडेल महागात!

towing.jpg
towing.jpg

नाशिक : शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा व रस्त्यांवरील नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावून वाहतुकीस अडथळा तयार करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिस आयुक्तलयातर्फे पुन्हा शहरात टोइंगची कारवाई करण्यास सुरवात होणार आहे. यासाठी प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा बंद झालेली टोइंग कारवाई पुन्हा सुरू होणार आहे. 

शहरात पुन्हा टोइंग होणार सुरू 
शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी, म्हणून शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जात होती. यामुळे शहरात वाहतुकीस शिस्त लागली होती. मात्र, टोइंगसाठी ठेका दिलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कामात होत असलेली हलगर्जी, नागरिकांसोबत असभ्य वर्तन, अरेरावी, धक्काबुक्की आदी वाढत्या तक्रारींमुळे शहर पोलिसांची प्रतिमा खराब झाल्याने पोलिस आयुक्तांनी टोइंग कारवाई बंद केली होती. ती बंद झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, कारवाई होत नसल्याने शहरातील वाहतुकीची शिस्त आता पुन्हा बिघडली आहे.

वाहने उचलण्याचा ठेका

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आदी ठिकाणी ‘नो पार्किंग’मध्ये आता वाहने लावली जात आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. कारवाई व आवाहन करूनही यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. यामुळे शहरात पुन्हा टोइंग कारवाई केली जाणार आहे. यासाठी नव्याने निविदा काढून ‘नो पार्किंग झोन’मधील दुचाकी, चारचाकी वाहने उचलण्याचा ठेका देण्यात येणार आहे. गेल्या ऑगस्टमध्ये तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर निविदापूर्व बैठक झाली. त्यानंतर आता वित्तीय लिफाफा उघडला जाणार आहे. 
 

टोइंगची कारवाई करण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणाऱ्याकडूनच टोइंग कारवाई केली जाईल. शहरातील सर्वच भागांत ही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे. - पौर्णिमा चौगुले- श्रींगी, पोलिस उपायुक्त  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com