पोलीसांच्या 'त्या' कारवाईचा व्यापाऱ्यांनी घेतला धसका 

मंगळवार, 30 जून 2020

कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे या शहरातही सम-विषम पध्दतीने दुकाने उघडली जातात. त्याची पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक पाहणी करीत असतांनाच सर्रास या नियमांचे उल्लघंन झाल्याचे त्यांना दिसले.त्यांनी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर अशी काही कारवाई केली की त्याचा इतर व्यापाऱ्यांनीही धसका घेतला..... 

नाशिक/ सटाणा : कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे या शहरातही सम-विषम पध्दतीने दुकाने उघडली जातात. त्याची पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक पाहणी करीत असतांनाच सर्रास या नियमांचे उल्लघंन झाल्याचे त्यांना दिसले.त्यांनी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर अशी काही कारवाई केली की त्याचा इतर व्यापाऱ्यांनीही धसका घेतला..... 

जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला बगल.... 
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शहराचा दौरा केला असता त्यांनी प्रशासनाला तातडीने शहरात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बागलाणचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे यांनी 16 जूनपासून या नियमांची कडक अंमलबाजवणी सुरू केली. प्रशासनाने लागू केलेल्या सम-विषम पद्धतीच्या नियमांची पायमल्ली करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या सात व्यावसायिकांवर सटाणा पोलिसांनी सोमवारी (ता. 29) गुन्हे दाखल केले आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

सात व्यावसायिकांवर  गुन्हे

सोमवारी (ता. 29) पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना शहरातील अनेक भागांत सम-विषम पद्धतीच्या नियमांची पायमल्ली करून दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात व्यावसायिकांवर पोलिस प्रशासनाने कोविड आजार प्रादुर्भावाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?