चांदीच्या गणेश मंडळाची १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक; यंदाचं कसं असेल स्वरुप?

युनूस शेख
Wednesday, 19 August 2020

 रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात येथील बाप्पाच्या दर्शनाने होते. दर वर्षी मंडळाकडून मंदिर परिसरात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याच्या १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक लागणार आहे.

नाशिक : रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याच्या १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक लागणार आहे. रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात येथील बाप्पाच्या दर्शनाने होते. दर वर्षी मंडळाकडून मंदिर परिसरात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. 

चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा
रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात येथील बाप्पाच्या दर्शनाने होते. दर वर्षी मंडळाकडून मंदिर परिसरात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे संकट असल्याने मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लहानसा मंडप उभारून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडपात आरास नसेल. मंदिर बंद असले तरी मंदिरावर रोषणाई करण्यात येणार आहे. केवळ पुजारी नेहमीप्रमाणे आरती, पूजा करण्यास मंदिरात येतील. मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते. दहा दिवस जणू रविवार कारंजा परिसरात यात्रेचे स्वरूप असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागणार आहे. या काळात मंडळाकडून रक्तदान, आरोग्य शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 

हेही वाचा >दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत साधेपणाने उत्सव साजरा केला जात आहे. मंदिर उघडण्याबाबत नवीन सूचना प्राप्त झाल्यास त्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येईल. - पोपटराव नागपुरे, कार्याध्यक्ष 
 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tradition of silver Ganesh Mandal has been broken nashik marathi news