सावली देणाऱ्यांवरच कुऱ्हाडीचा घाव..! पशू-पक्ष्यांचा निवारा हिरावणार?

shirdi highway tree.jpg
shirdi highway tree.jpg

नाशिक / पिंपळगाव बसवंत : सुरत- शिर्डी महामहार्गाच्या विस्तारीकरणासाठी पिंपळगाव शहरातील जुन्या महामार्गावरील वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. याविरोधात वृक्षप्रेमी आवाज उठवत आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला सावली देणाऱ्या झाडांची कत्तल थांबवावी किंवा महामार्ग पर्यायी मार्गाने काढावा, अशी मागणी पुढे आली आहे. 

पशू-पक्ष्यांचा निवारा हिरावला जाणार असल्याचा आरोप 

अन्युटी प्रकल्पांतर्गत सुरत-शिर्डी महामार्गाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. पिंपळगाव शहरातून हा रस्ता प्रस्तावित असून, त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देऊन ते हटविण्याचे काम, विस्तारीकरणात येणारे वृक्षतोड यांसह अडथळे दूर करणे सुरू आहे. त्यानुसार चार दिवसांपासून पिंपळगाव शहरातील जुन्या महामार्गावरील वृक्षतोड सुरू आहे. लिंब व चिंचाच्या झाडांची तोड सुरू आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष उसळला आहे. सावली व पशूपक्ष्यांचा निवारा हिरावला जाणार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. 

पिंपळगावच्या पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष;

वणी चौफुली ते निफाड फाटादरम्यान तब्बल 40 हून अधिक झाडे जमीनदोस्त होणार आहेत. ती तोडताना कायद्यानुसार एक झाड तोडल्यास तीन झाडांची लागवड याची अमंलबजावणी होणार आहे का?, वृक्षतोड करताना पर्यावरण विभागाची परवानगी घेतली आहे का, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. रस्त्यातील दुकाने हटविले जाणार असल्याने अनेकांना बेरोजगार व्हावे लागेल. त्यामुळे प्रस्तावित मार्ग आहेरगाव मार्गाने आरेखित करावा, अशी मागणी होत आहे. पर्यावरणप्रेमी विकास निखाडे, मनोहर पाटील, संतोष गडाख, नीलेश पाटील, किशोर जाधव यांनी वृक्षतोडीवर आक्षेप घेतला आहे. वृक्षतोड न थांबल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com