esakal | यंदा गणेशोत्सवासाठी कारागिरांचा कल छोट्या गणेशमूर्तींकडेच..! 
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh-utsav.png

दर वर्षी उत्सवाच्या चार महिने आधीच परप्रांतीय कारागीर येऊन मूर्ती बनवण्याचे काम करतात. यंदा अद्यापही हे कारागीर आलेले नाहीत. यंदा केवळ पाच फुटांपर्यंतच मूर्ती बनविली जात आहेत. बहुतांश मूर्ती दोन ते तीन फुटांच्याच आहेत. तर स्थानिक मूर्तिकार सध्या पोळ्यासाठी लागणारे मातीचे बैल तयार करीत आहेत. 

यंदा गणेशोत्सवासाठी कारागिरांचा कल छोट्या गणेशमूर्तींकडेच..! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी गणेशोत्सव जेमतेमच राहण्याची चिन्हे आहेत. त्यातच यंदा विविध मंडळांचा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल आहे. मोठ्या मूर्तींची मागणी अद्याप कोठूनही आलेली नाही. त्यामुळे येथील मूर्तिकार व कुंभार बांधवांनी लहान मूर्ती बनविण्यालाच प्राधान्य दिले आहे.

श्री विसर्जन मिरवणूक लक्षवेधी
मालेगावला गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून, येथील श्री विसर्जन मिरवणूक लक्षवेधी असते. गणेशोत्सवाच्या चार महिने आधीपासूनच मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू होते. मूर्तिकार तसे पाच ते सहा महिने आधीच मूर्ती तयार करण्याचे काम सुरू करतात. कोरोनामुळे या वर्षी मूर्तिकारांनाही फटका बसणार आहे. मोठ्या मूर्तींना मागणी नाही. त्यामुळे मूर्तिकारांनीही मोठ्या मूर्ती बनविण्याऐवजी घरगुती लहान मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे. येथे दर वर्षी उत्सवाच्या चार महिने आधीच परप्रांतीय कारागीर येऊन मूर्ती बनवण्याचे काम करतात. यंदा अद्यापही हे कारागीर आलेले नाहीत. यंदा केवळ पाच फुटांपर्यंतच मूर्ती बनविली जात आहेत. बहुतांश मूर्ती दोन ते तीन फुटांच्याच आहेत. तर स्थानिक मूर्तिकार सध्या पोळ्यासाठी लागणारे मातीचे बैल तयार करीत आहेत. 

मोठ्या मूर्तींना यंदा मागणी नसेल.. अशी शक्‍यता

साधारणत: 101 ते 501 रुपये यादरम्यान विक्री होणाऱ्या मूर्ती बनविल्या जात आहेत. मोठ्या मूर्तींना यंदा मागणी नसेल, अशी शक्‍यता गृहीत धरून मूर्तिकार लहान मूर्तीच तयार करीत आहेत. दहा दिवसांसाठी मुक्कामी येणाऱ्या गणरायाचे आगमन 22 ऑगस्टला होणार आहे. शहर व परिसरात लहान- मोठी साडेचारशेपेक्षा अधिक गणेश मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. येथील किमान 50 ते 70 मंडळांच्या गणेशमूर्ती 7 ते 20 फुटांच्या असतात. याशिवाय हजारो घरगुती मूर्तींचीही स्थापना होते.

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान
कोरोनामुळे यंदा मोठ्या मूर्तींचे अजून बुकिंग झालेले नाही. दर वर्षी जूनअखेर मोठ्या मूर्तींची बुकिंग पूर्ण होत असते. आम्ही लहान मूर्तीच तयार करीत आहोत. कोरोनामुळे गणेशोत्सव जेमतेमच होण्याची चिन्हे असल्याने मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. - रामदास बोरसे, मूर्तिकार, मालेगाव  

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

go to top