रेल्वेची तिहेरी सुरक्षा...सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी निर्णय बदल

railway 1.jpg
railway 1.jpg

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीयदृष्ट्या संशोधन व विकास या तत्त्वावर रेल्वे निर्णय बदल करीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी व कर्मचारी सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी रेल्वेने तिहेरी सुरक्षा अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. भुसावळ विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे. 

रेल्वेची तिहेरी सुरक्षा अंमलबजावणी
रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी भुसावळ मंडळमधील सर्व आरक्षण केंद्राच्या खिडकीवर "टू वे माइक सिस्टिम'ची सोय करण्यात आली आहे. प्रवासी आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रावर येत असतात आणि रांगेत असताना त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांनापण फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून संवाद साधावा लागत असतो. त्यामुळे खूप अडचणी येत असतात म्हूणन रेल्वे प्रशासनाच्या वतीने सर्व आरक्षण खिडकीवर "टू वे माईक सिस्टिम'ची सोय केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तिकीट चेकिंग स्टाफला फेस शील्ड आणि भिंगकाच देण्यात आली आहे. आरक्षण कार्यालयात अल्ट्रा वाईलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशिन लावण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com