तीन महिन्यांनी ट्रकचालकाचे प्रशिक्षण आवश्यक - भुजबळ

विनोद बेदरकर
Wednesday, 20 January 2021

कळसकर म्हणाले, की २०१५ पासून प्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता वाहतूक सुधारणांसाठी इंजिनिअरिंग सोल्यूशन, इन्फोर्समेंट आणि एज्युकेशन या त्रिसूत्रीनुसार कामकाज करताना अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. राज्यात फक्त नाशिकला चालकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला जातो. 

नाशिक : रस्ता वाहतुकीत सुधारणेला भरपूर वाव आहे. वाढते अपघात कमी करण्यासाठी कंटनेरसह ट्रकचालकांना तीन ते चार महिन्यांतून एकदा एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या सुरक्षा महिन्याचे भुजबळ यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

रस्ता सुरक्षा महिन्याला सुरवात 

भुजबळ म्हणाले, की रस्ते रुंद झाले म्हणजे अपघात कमी होतातच असे नाही, उलट चांगल्या रस्त्यावरून लोक अधिक वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी महामार्ग पंक्चर करून उपमार्ग काढले जातात. मोठ्या वाहनांमुळे नव्हे, तर ग्रामीण भागात दुचाकीमुळे अपघात वाढल्याचे पुढे आले आहे. खासदार डॉ. पवार यांनी वर्षभर उपक्रम राबविण्याचे, तर मांढरे यांनी ग्रामीण भागात रस्ते अपघात व मृत्यू रोखण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कळसकर म्हणाले, की २०१५ पासून प्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता वाहतूक सुधारणांसाठी इंजिनिअरिंग सोल्यूशन, इन्फोर्समेंट आणि एज्युकेशन या त्रिसूत्रीनुसार कामकाज करताना अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. राज्यात फक्त नाशिकला चालकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला जातो. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

माहितीपुस्तिकेचे प्रकाशन 

तत्पूर्वी उपस्थितांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन झाले. पुस्तिकेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्यात एक तास याप्रमाणे वाहतुकीचे नियम सांगून प्रबोधन केले जाणार आहे. यंदापासून उपक्रम राबविले जाणार असल्याचे कळसकर यांनी सांगितले.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To truck driver three months later Training required nashik marathi news