धक्कादायक! चक्क २५-३० रानकावळे मृतावस्थेत?

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कावळे निसर्गचक्राचा एक धागा आहे, ते आपली उपजीविका मृत जनावरे खाऊन करत असतात. पूर्वी गिधाडे असेच आपले उदरभरण करीत असत. मात्र, ते नामशेष झाले, म्हणून निसर्ग साखळीतील घटक म्हणून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. 

नाशिक : शहरापासून जवळच असलेल्या कोळवाडी रस्त्यावर शुक्रवारी (ता. 14) 25-30 रानकावळे मृतावस्थेत आढळले. याबाबत येथील पक्षीमित्र डॉ. उत्तम डेर्ले यांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने त्या कावळ्यांचे रेस्क्‍यू करत नाशिकला रवाना केले. 

अशी घडली घटना....

नांदूर पक्षी अभयारण्यपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोळवाडी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी डॉ. उत्तम डेर्ले आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, त्यांना रस्त्याच्या दुतर्फा कावळे मृतावस्थेत आढळले. त्यांनी कावळ्यांना एका ठिकाणी गोळा करून ठेवले व याबाबत वन विभागाचे अधिकारी संजय भंडारे यांना माहिती दिली. भंडारे यांनी तत्काळ दखल घेत रानकावळ्यांना रेस्क्‍यू करत शवविच्छेदनासाठी नाशिकला रवाना केले. 
दरम्यान, या कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे गूढ उकलणे गरजेचे आहे. याबाबत पक्षीप्रेमींनी वन विभागाला कळविले आहे. 

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

निसर्ग साखळीतील घटक म्हणून संवर्धन होणे गरजेचे

कावळे निसर्गचक्राचा एक धागा आहे, ते आपली उपजीविका मृत जनावरे खाऊन करत असतात. पूर्वी गिधाडे असेच आपले उदरभरण करीत असत. मात्र, ते नामशेष झाले, म्हणून निसर्ग साखळीतील घटक म्हणून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. - डॉ. उत्तम डेर्ले, अध्यक्ष, पक्षीमित्र मंडळ, निफाड  

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty five- thirty crows died in Nifad Nashi Marathi News