dhiraj.jpg
dhiraj.jpg

अखेर नियतीने केली ताटातुट! धाकट्याला वाचविण्यासाठी थोरल्या भावाचे प्रयत्न अयशस्वी; परिसरात हळहळ

नाशिक : सकाळच्या सुमारास घडली घटना...वय अवघे पंचवीस. मुंबईत नोकरीस असलेल्या धीरजच्या नशिबी असा दुर्देवी अंत. घटनेने कुटुंबियांसह परिसरात खळबळ उडाली आहे. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

ड्रेनेजचे काम करतांना भूमीगत वायर तुटलेल्या शॉक लागून शिवशक्ती चौकात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. धीरज जगताप (वय २५) असे मृत युवकाचे नाव. धीरज हा मुंबई येथे खासगी कार्यालयात नोकरीला होता. सिडकोतील शिवशक्ती चौकातील नानाजी जगताप कुटूंबा समवेत राहतात. या भागात ड्रेनेजचे काम सुरू होते. यात जेसीबी च्या धक्याने भूमीगत वायर तुटली. गुरुवारी सकाळी धीरज हा पाणी मारत असतांना विदयुत तारेचा शॉक लागला. त्याचा भाऊ अमोल जगताप (वय २८) त्याला वाचवायला गेला असता, त्यालाही शॉक लागून तो जखमी झाला. धीरजला लागलेला शॉक इतका जबर होता की, त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

अमोलला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com