kidnap.jpg
kidnap.jpg

नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच शहरातून दोन मुलांचे अपहरण; पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : नवीन वर्षीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील पवननगर व म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या प्रकरणी संबंधित अंबड व म्हसरुळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

असा आहे प्रकार

म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिसरातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या महिलेच्या अल्पवयीन मुलीस ३१ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फूस दाखवून पळवून नेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर पसिरातील अपहृत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांचा मुलगा बुधवारी (ता. ३०) रोजी फिर्यादी यांचा मुलगा नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेला असता, पुन्हा घरी परतला नाही, तसेच तो नातेवाइकांकडेही मिळून आला नाही, त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com