मद्यधुंद महिलांचा पोलीस ठाण्यातच फ्रि-स्टाईल हंगामा! महिला पोलिसांनाही शिवीगाळ व मारहाण

two woman fight.png
two woman fight.png

नाशिक : दारुच्या नशेतच दोन महिलांनी पोलीस ठाण्यात एंट्री केली. अन् आरडाओरड मग हंगामा...अगदी चित्रपटात घडत असल्याप्रमाणे सारं काही घडत होतं. त्या महिलांनी अचानक पोलीस स्थानकात भांडणास सुरुवात केली. त्यानंतर जे काही घडलं ते अतिशय निंदनीय कृत्य होते.

महिला पोलीस शिपाई मध्यस्थी जाताच त्यांनाही मारहाण

बुधवारी (ता.५) रात्री ११.३० वाजेदरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यात एक अतिशय निंदनीय घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत दोघींपैकी एक महिला ही गंगापूर पोलीस ठाण्यात दुसऱ्या महिलेविषयी तक्रार देण्यासाठी आली. त्यावेळी दोघींमध्ये भांडण चालू झाले. . भांडण सोडविण्यासाठी महिला पोलीस शिपाई मध्यस्थी झाल्या असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघींनी महिला पोलीसांना मोठमोठ्याने आरडओरड व शिवीगाळ केली. त्यानंतर संगनमताने दोघी महिला पोलीस यांच्याकडे धावून आल्या. सरकारी कामात अडथळा आणत दोघींनी महिला पोलीसाला खाली पाडून मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या आहेत.एकीने तर महिला पोलीसांना चावा घेत दुखापत केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल

दोन महिला पोलीस भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी झाल्या असता त्यांनाच मद्यपी महिलांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई मिरा सुरेश मोटे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com