मित्राचा फोन उचलला पोलीसांनी .. अन् बातमीने वडिलांच्या काळजाचा चुकला ठोका!

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 27 May 2020

सिद्धार्थ पगारे हा मध्यरात्री कामावर असताना साडेबाराच्या सुमारास पंपावरून वडिलांना काही न सांगता निघून गेला. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास मुलाचा शोध घेताना वडिलांनी मोबाईलवर संपर्क केला. मात्र मोबाइल अपघातात तुटल्याने बंद येत होता. म्हणून त्याचा मित्राच्या मोबाईलवर संपर्क केला असता वडिलांना धक्काच बसला.

नाशिक / येवला : सिद्धार्थ पगारे हा मध्यरात्री कामावर असताना साडेबाराच्या सुमारास पंपावरून वडिलांना काही न सांगता निघून गेला. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास मुलाचा शोध घेताना वडिलांनी मोबाईलवर संपर्क केला. मात्र मोबाइल अपघातात तुटल्याने बंद येत होता. म्हणून त्याचा मित्राच्या मोबाईलवर संपर्क केला असता वडिलांना धक्काच बसला.

वडिलांचा मित्राला फोन अन्‌ मिळाली वाईट बातमी 

शहरातील एका पेट्रोलपंपावर वडिलांसह कामाला असलेला सिद्धार्थ अनिल पगारे (रा. मनमाड) हा सोमवारी (ता. 25) मध्यरात्री कामावर असताना साडेबाराच्या सुमारास पंपावरून वडिलांना काही न सांगता निघून गेला. त्यानंतर दोनच्या सुमारास मुलाचा शोध घेताना वडिलांनी मोबाईलवर संपर्क केला. मात्र मोबाइल अपघातात तुटल्याने बंद येत होता म्हणून त्याचा मित्र अनिकेत रत्नाकर उबाळे (रा. विठ्ठलनगर, येवला) याच्या मोबाईलवर संपर्क केला असता, संबंधित मोबाईल पोलिसांकडे होता. पोलिसांनी तिकडून अपघाताची माहिती देताच वडिलांना धक्काच बसला. 

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

ट्रक किंवा मोठ्या वाहनाने धडक दिल्याचा अंदाज

येवला येथील एका पेट्रोलपंपावर कामाला असलेला युवक मित्रासह मनमाडला घराच्या दिशेने निघाला खरा; पण सावरगावजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मित्रासह त्यालाही आपला जीव गमवावा लागला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुक्‍यातील सावरगाव येथील शिंदे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांच्या स्कूटीला जोरदार टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला. येथून मनमाड येथे जाताना हा अपघात झाला असून, या अपघातात अनिकेत उबाळे व सिद्धार्थ पगारे या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. येवला ते मनमाडदरम्यान महामार्गालगत साईडपट्ट्या नसून मोठ्या कपारी तयार झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. मध्यरात्री ट्रक किंवा मोठ्या वाहनाने धडक दिल्याचा अंदाज असून, पोलिस तपास करत आहेत. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths from Manmad and Yeola were killed in an accident near Savargaon nashik marathi news