कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांची घेणार भेट : कृषिमंत्री भुसे 

dada bhuse 123.jpg
dada bhuse 123.jpg

नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी या मागणीसाठी येत्या पाच दिवसांत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कृषीमंत्री तोमर आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी (ता. २३) भुसे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठीचे विनंती पत्र श्री. भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. संघटनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, देवेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त

‘कृषि’च्‍या प्रवेशासाठी मुदतवाढ 
नाशिक : राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत कृषी शिक्षण अभ्यासक्रमांच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली वाढीव मुदत बुधवारी (ता.२३) संपली. त्यानंती पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांशी संलग्‍ महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. यात बी. एस्सी. (कृषी) व कृषि अभियांत्रिकीसह अन्‍य अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या निकालाच्‍या आधारे हे प्रवेश दिले जाणार आहेत. कॅप राउंड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी घेणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया गेल्‍या १६ डिसेंबरला सुरू झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com