अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला; ३ एकरवरील टोमॅटो पीक मातीमोल

गोपाळ शिंदे
Sunday, 10 January 2021

रब्बी पिकांची होणारी वाढ व फुटवा थांबला आहे. गेल्या हंगामात धानाला फुटलेले कोंब आणि घसरलेला दर्जा, ओल्या दुष्काळाला तोंड देताना शेतकरी आधीच हतबल झाला आहे. वातावरणातील विशेष बदल पिकांचा दर्जा घसरला जाऊन आर्थिक फटका बसतो.

घोटी (नाशिक) : चालू आठवड्यातील वातावरणातील कमालीचा बदल कडधान्ये व बागायती यांसह इतर नगदी पिकांना धोकादायक ठरत आहे. पंधरा दिवस मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुका धुक्याने वेढला होता. त्यात आवकाळी पावसाने अधूनमधून जोर धरल्याने फुलोरा व कळ्यांवर आलेली पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

कडधान्य पिकांना अधिकच ओलावा नको असतो. त्यामुळे टाकलेले बियाणे व लावलेले बागायती रोपे सडून जातात. अवकाळी पाऊस सुरू राहिल्याने शेतातील ओलावा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पिके पिवळी पडून झाडेही गळून पडली जातात. रब्बी पिकांची होणारी वाढ व फुटवा थांबला आहे. गेल्या हंगामात धानाला फुटलेले कोंब आणि घसरलेला दर्जा, ओल्या दुष्काळाला तोंड देताना शेतकरी आधीच हतबल झाला आहे. वातावरणातील विशेष बदल पिकांचा दर्जा घसरला जाऊन आर्थिक फटका बसतो. लावलेल्या बागायती पिकांतून भाग भांडवलाचे मोलही मिळणार का, अशा दुहेरी परिस्थितीतून शेतकऱ्यांना जावे लागत आहे. त्यात घेतलेल्या कर्जाचे काय हादेखील प्रश्‍न समोर आ वासून उभा आहे. महागडी शेतपिकांची औषधेही परवडणारी नाहीत. संकटावर संकटे झेलणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस तरी कधी येईल हे सांगणे अद्यापही कोणत्या जोतिष्यास जमलेले नाही. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

दोन लाखांचे कर्ज काढून तीन एकरवर टोमॅटोची लागवड केली. धुके आणि अवकाळी पावसाने वाढीस लागलेल्या पिकांचे अतोनात नुकसान सुरू झाले आहे. फुल-कळ्या झडल्या जाऊन पिकावर काळे डाग पडत आहेत. अनेकदा शेती पिकासंदर्भात कृषीतज्ज्ञाचे मार्गदर्शन घेत असलो तरी वातावरणातील बदल सुधारू देत नाही. – रंगानाथ वाजे, शेतकरी, खेड 

पिके काढणीला आल्यावर नेहमीप्रमाणे बाजार भाव कोसळणे त्यात आणखी भर पडलीय वातावरणाची. महागडे औषधे झेपावत नाही. पिकांचा दर्जा घसरला जाऊन बाजारभाव देखील मिळत नाही. सरकारने आहे त्या पिकांवर आधारित प्रकल्प सुरू केले पाहिजे. – नारायण जाधव, शेतकरी, घोटी  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unseasonal rains caused severe damage to farmers in Ghoti nashik marathi news