अवघ्या ३५ सेकंदात रेखाटलं चित्र! उत्कर्ष झोलेच्या पेंटिंगची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

खंडू मोरे
Wednesday, 14 October 2020

स्मॉलेस्ट फिंगर पेंटींग'मध्ये अवघ्या पस्तीस सेकंदात निसर्ग चित्र चितारल्याचा विक्रम पळसे, नाशिक रोड येथील उत्कर्ष झोले यांनी केला.

नाशिक/खामखेडा : 'स्मॉलेस्ट फिंगर पेंटींग'मध्ये अवघ्या पस्तीस सेकंदात निसर्ग चित्र चितारल्याचा विक्रम पळसे, नाशिक रोड येथील उत्कर्ष झोले यांनी केला. या विक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ इंडिया रेकॉर्ड'च्या २०२१ च्या आवृत्तीमध्ये नोंद झाली आहे. उत्कर्ष याने अवघ्या पस्तीस सेकंदात चित्र काढत रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

उत्कर्ष हा पळसे ,नाशिकरोड येथिल रहीवाशी व नाशिक जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले यांचा मुलगा आहे.त्याने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय शिक्षणासाठी तो तयारी करत आहे. उत्कर्षला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. तो ही कला छंद म्हणुन जोपासत आहे. उत्कर्षने नुकताच स्मॉलेस्ट फिंगर पेंटिंगमध्ये सहभाग घेऊन  कमी वेळात चित्र काढण्याचा नवा विक्रम केला आहे. यापुर्वीचा ४१ सेकंदाचा रेकॉर्ड मोडीत काढून १.५ सेंटीमिटर लांबी व एक सेंटीमीटर रुंदीचे निसर्ग चित्र ३५ सेकंदात काढून उत्कर्षने नवीन विक्रमाची नोंद केली आहे.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

अवश्य कागदपत्रे तसेच सर्व पुरावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमकडे पाठवल्यानंतर उत्कर्ष याला ब्रँड न्यू जीडब्ल्यूआर २०२१  च्या आवृत्तीतील वैशिष्ट्यांसह यशस्वी प्रयत्नासाठी अधिकृत नोंदवही, प्रमाणपत्र व मेडल प्राप्त झाले आहे. त्याला आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. विक्रमवीर उत्कर्ष झोले यांनी केलेल्या नवीन विक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Utkarsh Zoles painting recorded in India Book of Records nashik marathi news