esakal | नाशिक शहर-जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात; ४१ खासगी केंद्रांना परवानगी 

बोलून बातमी शोधा

Vaccination started in Nashik city and district Marathi news}

कोविड रुग्णालयात शहर-जिल्ह्यात सोमवार (ता. १)पासून ज्येष्ठांसाठी लसीकरणाला सुरवात झाली. महापालिकेच्या बिटको आणि इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणाला पहिल्याच दिवशी ज्येष्ठांनी हजेरी लावली.

नाशिक शहर-जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात; ४१ खासगी केंद्रांना परवानगी 
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोविड रुग्णालयात शहर-जिल्ह्यात सोमवार (ता. १)पासून ज्येष्ठांसाठी लसीकरणाला सुरवात झाली. महापालिकेच्या बिटको आणि इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणाला पहिल्याच दिवशी ज्येष्ठांनी हजेरी लावली. जिल्ह्याचे प्रमुख रुग्णालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र मंगळवार (ता. २)पासून ज्येष्ठांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने शहर व जिल्‍ह्यात ४१ केंद्रांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. 

कोरोनावर मात करण्यासाठी कोविड लसीकरणाला सुरवात झाली आहे. देशात सोमवारपासूनच ठिकठिकाणी लसीकरणाची मोहीम सुरू झाली, शासकीय रुग्णालयाशिवाय आरोग्य विभागाने मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयातही नागरिकांना लस देण्याचा प्रारंभ सोमवार 
झाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे ४१ खासगी रुग्णालयात ज्येष्ठांसाठी लसीकरण करण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारी विविध 
केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

सिव्हिलला आजपासून 

शहरात इंदिरा गांधी रुग्णालय आणि नाशिक रोड विभागातील महापालिकेचे बिटको रुग्णालय अशा तीन ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सोमवारी महापालिका रुग्णालयात संबंधित कर्मचाऱ्यांना ड्यूट्या वाटपासह विविध कामे सुरू झाली होती. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दुपारी तीनपर्यंत पावणेतीनशेच्या आसपास नागरिकांना लस दिली गेली होती. कोविड रुग्णांसाठी सर्वप्रथम ज्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले. त्या सिव्हिल रुग्णालयात मात्र मंगळवार (ता. २)पासून लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

 जिल्हा रुग्णालयात लसीकरणाची सोय असणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. लसीकरणाच्या नियोजनानंतर नागरिकांना माहितीचे सविस्तर निवेदन काढले जाईल. 
-डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल, नाशिक