लॉकडाउनमध्ये 'तो' जिंकला तब्बल 30 हजारांची बक्षिसे!...एकदा वाचाच

वैभव अनिल अलई.jpg
वैभव अनिल अलई.jpg

नाशिक : घरात बसून कंटाळा आलाय?...मग विरंगुळा म्हणून तुम्ही काय करताय?...या पठ्ठ्याने बघा काय केलंय...लोहोणेर (ता. देवळा) येथील वैभव अनिल अलई या युवकाने लॉकडाउनचा सदुपयोग करून घेत आपली लेखनशैली अधिक प्रभावी केली आणि तब्बल 30 हजारांची बक्षिसे मिळवली अन् अजूनही काही स्पर्धांचे निकाल बाकी असून तो म्हणतोय पिक्चर अभी बाकी है...

लेखनशैलीचा अधिक प्रभावी वापर

दोन महिन्यांतील लॉकडाउनच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, बुद्धपौर्णिमा, संभाजी महाराज जयंती असे अनेक सांस्कृतिक सण येऊन गेले. दर वर्षी हे सांस्कृतिक सण साजरे करताना राज्यभर अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या वेळी मात्र लोकांना एकत्र येण्यास बंदी असल्याने या स्पर्धांनीही आता डिजिटल रूप धारण केले आहे. त्यामुळे स्पर्धकांना घरी बसूनच स्पर्धेत सहभाग घ्यावा लागला. वैभवनेही लॉकडाउनच्या काळात अशा अनेक डिजिटल निबंध स्पर्धांत सहभाग घेतला आणि आतापर्यंत एकूण 13 राज्यस्तरीय निबंध स्पर्धांपैकी आठ स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक, तर इतर स्पर्धांमध्ये द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत तब्बल 30 हजारांची बक्षिसे मिळवली. अजूनही वैभवने भाग घेतलेल्या अनेक स्पर्धांचा निकाल लागायचा बाकी आहे, ज्यातही त्याला यशाची अपेक्षा आहे. 

पुणे येथे नेहरू युवा केंद्रात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक म्हणून काम करताना वैभव लोकांना आरोग्य सेतू आणि आयगॉट दीक्षा ऍप डाउनलोड करून देऊन प्रशिक्षित करणे, जिल्ह्यात कोरोनायोद्धा म्हणून काम करण्यास उत्सुक असलेल्यांची नोंदणी करणे, त्यांच्या कामाचा अहवाल बनवणे, मास्क, सॅनिटायझर आणि अन्नवाटप यांसारखी कामे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, तो स्पर्धा परीक्षांची तयारीही करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com