Republic Day 2020 : एकसुरात साडेअकरा हजार नागरिक जेव्हा गातात "वंदे मातरम' !

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 26 January 2020

देशभक्‍तीवर आधारित गीतांचे सादरीकरण, कथक नृत्यांतून व्यक्‍त केलेले देशप्रेम. त्यात हात उंच करत तिरंगा फडकावताना "भारतमाता की जय'चा घोष केला. शनिवारी (ता. 25) भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या "वंद्य वंदे मातरम' उपक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सहभागी होत साडेअकरा हजार नाशिककरांनी एकसुरात "वंदे मातरम' म्हणत लक्ष वेधले. 

नाशिक : देशभक्‍तीवर आधारित गीतांचे सादरीकरण, कथक नृत्यांतून व्यक्‍त केलेले देशप्रेम. त्यात हात उंच करत तिरंगा फडकावताना "भारतमाता की जय'चा घोष केला. शनिवारी (ता. 25) भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या "वंद्य वंदे मातरम' उपक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सहभागी होत साडेअकरा हजार नाशिककरांनी एकसुरात "वंदे मातरम' म्हणत लक्ष वेधले. 

Image may contain: one or more people and people on stage

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला "वंद्य वंदे मातरम' 

नववर्ष स्वागत समितीतर्फे झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील वातावरणात उत्साह संचारला होता. ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार, श्रीमद्‌भगवद्‌गीता प्रवचनकार विनय पत्राळे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी तीन रंगांच्या असलेल्या टोप्या डोक्‍यावर घालून उपस्थितांनी तिरंगा साकारला. सामूहिक वंदे मातरम गायनापूर्वी व्यासपीठीय कार्यक्रमाद्वारे देशभक्‍तीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमास महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्‍त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्‍त विश्‍वास नांगरे-पाटील आदी उपस्थित होते. या वेळी कारगिल युद्धातील जवान दीपचंद यांचे स्वागत करण्यात आले. 

 

"कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत

कथकचे सुंदर सादरीकरण

कार्यक्रमाच्या सुरवातीस भरतनाट्यमचे सादरीकरण शिल्पा देशमुख, सोनाली शहा, पौर्णिमा झेंडे, मीनल शहा, पल्लवी चौरे, धनश्री चंद्रात्रे यांनी केले. कथकचे सादरीकरण सुमुखी अथनी, कीर्ती शुक्‍ल, गौरी औरंगाबादकर, दीपा बक्षी आदींनी केले. बासरीवादन मोहन उपासनी, रवी जोशी, अनिल कुटे यांनी केले. संगीत क्षेत्रातील पं. अविराज तायडे, संजय गिते, ज्ञानेश्‍वर कासार, आशिष रानडे, अनिल धुमाळ, नितीन वारे, आदित्य कुलकर्णी, उमेश खैरनार, सुमीत काळे आदींची उपस्थित होती.  

हेही वाचा > अमित ठाकरे यांचे खरे 'लॉंचिंग' नाशिकमध्येच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Vande Mataram' sang by nashik,s citizens in one go Marathi News