photos : जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमला रामकुंड परिसर...!

दत्ता जाधव
Wednesday, 5 August 2020

वनवासानिमित्त चौदा वर्षातील मोठा काळ पंचवटी परिसरात व्यतित केल्याने श्रीरामाचा नाशिकला मोठा भक्तपरिवार असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर रामकुंडावर विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते.

नाशिक : (पंचवटी) अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या कामासाठी बुधवारी (ता. 5) शिलान्यास व भुमिपूजन पार पडले. त्याचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांतर्फे पंचवटीतील रामकुंडावर महाआरती व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

आरती संपल्यानंतर श्रीराम नामाच्या जयघोष 

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भुमिपूजन सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या पवित्र रामकुंडावर सकाळी खासदार हेमंत गोडसे, आमदार अॅड राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सिमा हिरे, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, नगरसेविका श्यामला दीक्षित, विजय साने, सुरेशअण्णा पाटील आदींच्या हस्ते गोदावरी नदीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर गोमुखाचे देखील पुजन करण्यात आले. यानंतर रामकुंडावर असलेल्या श्रीराम स्तंभाचेही पुजन करण्यात आले. यावेळी श्रीराम स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठण करण्यात आले. श्रीरामाची आणि हनुमानाची आरतीही करण्यात आली. आरती संपल्यानंतर श्रीरामानामाच्या जयघोष करण्यात आला. यावेळी प्रसाद म्हणून पेढे तसेच लाडुचेही वाटप करण्यात आला. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले. 

Image may contain: 1 person

Image may contain: 1 person, outdoor

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात 

आधुनिक भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमी पुजनाच्या कामासाठी आज बुधवार (ता. 5) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोजक्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्‍थितीत भुमिपूजन सोहळा पार पडला. वनवासानिमित्त चौदा वर्षातील मोठा काळ पंचवटी परिसरात व्यतित केल्याने श्रीरामाचा नाशिकला मोठा भक्तपरिवार असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर रामकुंडावर विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते. सोहळ्याच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रामकुंड परिसरासह काळाराम मंदिराच्या सर्वच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

Image may contain: 4 people, people standing, shoes and outdoor

Image may contain: 2 people, including Vikas Shinde, people standing and outdoor

हेही वाचा > आठवणीतील अयोध्या : जेव्हा शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयू’चा काठ.. नाशिकमधील शिवसैनिकांची कार्यक्रमात छाप

Image may contain: one or more people, people standing and outdoor

कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवून विरोध

श्रीराम हे संपूर्ण भारताची अस्मिता आहे. राममंदिराचे निर्माण ही संपूर्ण देशासाठी आनंददायी आहे. खरेतर हा सोहळा दिवाळीसारखा साजरा व्हायला हवा होता. परंतु पोलिसांनी रात्रीतून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवून विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर महिलांना सडारांगोळी काढण्यासही मज्जाव करण्यात आला. याचा आम्ही निषेध करत असल्याचे नाशिक मध्यच्या आमदार देवयांनी फरांदे यांनी सांगितले. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various programs were held in the suburbs of Nashik city chanting Ram nashik marathi news