धक्कादायक! टायरने गच्च भरलेल्या पिकअपच्या आत मात्र भलतेच; पदभार स्वीकारताच API यांची कार्यवाही

janawar.jpg
janawar.jpg

नाशिक : (अंबासन) रात्रीची वेळ...विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरुन संशयास्पद पिकअप (एमएच ४२, एयू ११४२) जात होती. पोलिसांना आधीच संशय होताच. झडती घेताच जे दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. वर जूने टायर अन् खाली भलतेच होते. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

बुधवार (ता.४) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळनेर ताहाराबाद रस्त्यावरील द्वारकाधीश कारखाना फाट्यानजीक धक्कादायक घटना घडली. कसमादे अॅग्रो प्रोड्युसर लि. कंपनीचे दुध डेअरीनजीक जुने टायर भरलेला पिकअप (एमएच ४२, एयू ११४२) संशयास्पद हलताना दुध डेअरीवर काम करणारा आकाश चव्हाण यांना दिसला. त्यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे यांना भ्रमणध्वनीवर माहीती दिली. संशयास्पद पिकअपमधून बेकायदेशीर जनावरे निर्दयपणे कोंबून कत्तलीच्या इराद्याने वाहतुक करीत असल्याची माहिती पोलिसांनाही मिळालीच होती. लगेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण बी. पारधी यांनी कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले. वर जूने टायर अन् खाली भलतेच होते. निर्दयपणे अवघडलेल्या अवस्थेत तीन गायी व एक वासरू घेऊन जात होते.

अंधाराचा अंदाज घेत चालक फरार

गणेश पवार, अमोल देवरे, भुषण देवरे, बंडू देवरे, हर्षल आहिरे, आकाश चव्हाण, पोपट सोनवणे, डॉ. नितीन पवार पोहचले. तरूणांच्या मदतीने टायरखाली निर्दयपणे बांधलेले तीन गायी व एक वासरू यांची सुटका केली. यात दोन गायी किरकोळ जखमी झाल्याचे निदर्शनास आले. मात्र अंधाराचा अंदाज घेऊन चालक फरार झाला.

चार लाख ७५ हजार किमंतीचा माल हस्तगत

वाहनासह चार लाख ७५ हजार किमंतीचा माल हस्तगत करून जायखेडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पारधी यांनी पदभार स्वीकारताच धडाकेबाज कार्यवाही केल्याने परिसरात कौतुक केले जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com