त्र्यंबकेश्वर मंदिरात धार्मिक नियम धाब्यावर! मंदिरात चक्क ‘व्हीआयपी’चे शस्त्रधारी सैनिक?

कमलाकर अकोलकर
Monday, 4 January 2021

नूतन व्यवस्थापन व अतिविशिष्ट व्यक्तींच्या सरबराईसाठी तत्पर असणारे काही असल्या गोष्टी क्षुल्लक ठरवतात. मात्र, सर्वसामान्य लोकांना या नियमांचा मोठा धाक दर्शविला जातो याची चर्चा आहे.  

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक)  : येथे शनिवारी (ता. २) सकाळी अकराला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान दर्शन, पूजेसाठी आले होते. पुष्कळ वर्षांपासून ते येथे नववर्षाच्या सुरवातीला हजेरी लावतात. त्यांचे सर्व कुटुंबीय भाविक असल्याने ते येतात व पूजा करतात. उपस्थित लोकांशी ते बोलतात. फोटोसेशनही केले जाते. यात कुठेही अवडंबर नसते. त्यांच्या उपस्थितीत नियम पाळले जातात. कारण अनेक वर्षे येत असतात. या वेळी मात्र उत्साही कारणांमुळे त्यांचे शस्त्रधारी अंगरक्षक अत्याधुनिक हत्यारांसहित मंदिरात पूजाकालात हजर होते.

त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी’चे सशस्त्र सैनिक; धार्मिक नियम धाब्यावर 

या मंदिरात अलिखित नियमानुसार हत्यारे घेऊन मंदिरात प्रवेश नाही; परंतु नूतन व्यवस्थापन व अतिविशिष्ट व्यक्तींच्या सरबराईसाठी तत्पर असणारे काही असल्या गोष्टी क्षुल्लक ठरवतात. मात्र, सर्वसामान्य लोकांना या नियमांचा मोठा धाक दर्शविला जातो याची चर्चा आहे.  

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VIP bouncer with weapons at Trimbakeshwar Temple nashik marathi news