VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

मुलाच्या लग्नाचा आनंद गगनात मावेनासा...अन् या आनंदाच्या सोहळ्यात एखाद्या बापाचे पाय थिरकणार नाही तर नवलच..! अशा मंगल समयी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नृत्याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय..एकदा बघाच...

नाशिक :  मुलाच्या लग्नाचा आनंद गगनात मावेनासा...अन् या आनंदाच्या सोहळ्यात एखाद्या बापाचे पाय थिरकणार नाही तर नवलच..! अशा मंगल समयी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नृत्याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय..एकदा बघाच...

आदिवासी पारंपारीक वाद्यावर धरलेला  ठेक्याचा व्हिडीआ.. एकदा बघाच...

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ व करंजाळी (पेठ) येथील पद्माकर गवळी यांची कन्या जयमाला यांचा विवाह मंगळवारी ता. ३० रोजी कोरोनाच्या पार्श्नभूमीवर शासनाच्या नियमावलींचे पालन करीत अतिशय साध्या पध्दतीने व अवघ्या पन्नास नातलगांच्या उपस्थित पार पडला.लग्नाच्या पूर्वसंध्येस सोमवारी सायंकाळी वनारे येथे झालेल्या हळदी समारंभा दरम्यान नामदार नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी पांरपारीक वाद्यावर ठेका धरीत मुलाच्या विवाहाचा आनंद लुटला.. या अगोदरही झिरवाळ यांनी जागतिक आदिवासी दिनाची शोभायात्रा तसेच वेगवेगळ्या प्रासंगिक कार्यक्रमांमध्ये ताटी नृत्य करुन आपली नृत्याविष्काराची झलक दिलेली आहे.

हेही वाचा > "बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर

Image may contain: 1 person, closeup

गावकी बाणा गावकऱ्यांनाही मोहित करून आपलेसे करून गेला

साधे सरळ राहणीमान असलेले नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे खंदे समर्थक आणि साध व्यक्तिमत्त्व म्हणून थेट राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची नामी संधी चालून आली. सेलिब्रेटी सुरक्षा, लवाजमा पाठीमागे असतानाही आपली साधी सरळ राहणीमान आणि आपला गावकी स्वभाव त्यांनी सोडला नाही याचा प्रत्येय विधानसभा कामकाजात आणि आता मुलाच्या विवाहाच्या निमितानेही आला. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी  आपल्या सुपुत्राच्या हळदी समारंभात  आपल्या सौभाग्यवती समवेत स्वतःच्या आनंदाला आवर घालू शकले नाहीत, आपला गावकी बाणा गावकऱ्यांना ही मोहित करून आपलेसे करून गेला.....

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral video of Assembly Speaker Narhari zirwal's dance nashik marathi news