नशिबाची क्रूर थट्टा...लाखामोलाची पैठणीही गेली..अन् स्वप्नही झाले मातीमोल..!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यापासून पैठणीचा व्यवसाय ठप्प होता.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुदैवाने एक लाखाच्या पैठणीची एक ऑर्डर मिळाल्याने ते विणकर कुटुंब आनंदात होते.पण शेवटचे पदराच्या हस्तकलेचे काम सुरू असतांनाच नशिबाचा फेरा आला आणि सारेकाही मातीमोल झाले..... 

नाशिक/ येवला : लॉकडाऊनमुळे तीन महिन्यापासून पैठणीचा व्यवसाय ठप्प होता.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुदैवाने एक लाखाच्या पैठणीची एक ऑर्डर मिळाल्याने ते विणकर कुटुंब आनंदात होते.पण शेवटचे पदराच्या हस्तकलेचे काम सुरू असतांनाच नशिबाचा फेरा आला आणि सारेकाही मातीमोल झाले..... 

हातमागाचे मोठे नुकसान

कोरोनाच्या महामारीमुळे तीन महिने घरात बसण्याची वेळ आली होती. आता लॉकडाउन शिथिल झाल्याने विणकाम सुरू झाले खरे; पण पैठणीला मागणी नसताना या नैसर्गिक आपत्तीने मोठे संकट कुटुंबावर ओढावले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे तीन महिने घरात बसण्याची वेळ आली होती. आता लॉकडाउन शिथिल झाल्याने विणकाम सुरू झाले खरे; पण पैठणीला मागणी नसताना या नैसर्गिक आपत्तीने मोठे संकट कुटुंबावर ओढावले आहे. नागडे येथील पैठणी कारागीर अश्‍विनी बोंदार्डे या काम सुरू करण्याच्या तयारीत असताना सकाळी सातला घराची भिंत अचानक कोसळली. या दोन्ही हातमागावर प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचे ब्रॉकेट पैठणीच पण भिंत कोसळल्याने हातमागासह साडीचेदेखील प्रचंड नुकसान झाले.

सांगा आता कर्ज कसे फेडू ?

त्यांनी विणकाम व्यवसाय उभारण्यासाठी बॅंकेचे मुद्रा लोन घेतले असून, आता हे कर्जाचे हप्ते फेडण्यासह व्यवसाय पुन्हा उभा करण्याचा प्रश्‍न बोंदार्डे कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. या घटनेचा पंचनामा होऊन शासनाने आम्हाला मदात करावी, अशी मागणी बोंदार्डे यांनी केली आहे. 

हेही वाचा > भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

एकीकडे व्यवसाय ठप्प..दुसरीकडे नुकसानीचा मोठा धक्का

मागील दोन दिवसांपासून येवला तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे नागडे येथील बोंदार्डे यांच्या घराची भिंत कोसळून घरातील हातमागाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी बोंदार्डे कुटुंबाने केली.लॉकडाउनमुळे पैठणी विणकरांचे अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. नागडे (ता. येवला) येथील एका होतकरू पैठणी विणकराच्या घराची भिंत कोसळून घरातील हातमाग चक्काचूर झाले असून, त्यामुळे त्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. एकीकडे व्यवसाय ठप्प झाला असताना नुकसानीचा मोठा धक्का या कुटुंबीयास बसला आहे. 

हेही वाचा >  सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wall collapsed on paithani,s factory at yeola nashik marathi news