वालदेवीतून आरक्षित पाणी सोडण्यास विभागाची टाळाटाळ; गंगापूर धरणातून अतिरिक्त उपसा

Water Resources Department's refusal to release reserved water from Valdevi
Water Resources Department's refusal to release reserved water from Valdevi

नाशिक : नाशिक रोड विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी दारणा धरणात पाणी आरक्षित केले जात असले, तरी त्या पाण्यात अळी, कीटक असल्याने महापालिकेकडून गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी उपसले जात असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाने दिली. जलसंपदा विभागाकडे वालदेवीतून आरक्षित पाणी सोडण्याची विनंती सहा महिन्यांपासून केली जात आहे. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने जलसंपदा विभागाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहराला गंगापूर, मुकणे व दारणा धरणांतून पाणीपुरवठा होतो. मुकणेचे पाणी सिडकोचा काही भाग, इंदिरानगर ते उपनगरपर्यंतच्या भागात पोचते. दारणा धरणातील आरक्षित पाणी नाशिक रोड विभागासाठी पुरविले जाते. उर्वरित शहरासाठी गंगापूर धरणातील थेट पाइपलाइनमधून पाणीपुरवठा होतो. दारणा नदीवर चेहेडी येथे महापालिकेने बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यातून पाणी उपसा केले जाते. उपसा केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून जलकुंभाद्वारे नाशिक रोडच्या विविध भागांत पाणी पोचते. चेहेडी बंधारा येथून पाणी उचलल्यानंतर क्लोरिनद्वारे शुद्धीकरण होते. परंतु ते वापरण्याचे प्रमाण ठरले आहे. अधिक क्लोरिन वापरल्यास घसा खवखवणे व खोकला होत असल्याने त्याचा मर्यादित वापर करावा लागतो. क्लोरिन वापरूनही पाण्यात अळी, कीटक आढळत असल्याने याविषयावर नाशिक रोड विभागातील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली होती. नगरसेवक राहुल दिले, प्रा. शरद मोरे, सत्यभामा गाडेकर यांनी पाण्यावरून प्रशासनाला जाब विचारला. त्या वेळी जलसंपदा विभागाने आरक्षित पाणी सोडल्यास दूषित पाणी वाहून जाऊ शकते, परंतु यासंदर्भात सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार करूनही दाद दिली जात नसल्याचे सांगण्यात आल्याने आता नाशिक रोडच्या पाण्याचा वाद थेट शासनदरबारी पोचणार आहे.

चेहेडी बंधारा मागे घेण्याचा प्रस्ताव
दारणा धरणातून वालदेवीमध्ये पाणी पोचते. आर्टिलरी सेंटर व काही गावांतील ड्रेनेज व अन्य लाइन नदीत सोडल्या आहेत. पुढे हे पाणी दूषित होत असल्याने तेच पाणी चेहेडी बंधारा येथे पोचून नाशिक रोड भागात पुरवठा केला जातो. त्यामुळे चेहेडी बंधाऱ्याऐवजी पुढे बॉक्स कन्व्हर्ट तयार करावा, इंटेक वेल चेहेडीऐवजी वालदेवी नदीच्या पलीकडे उभारण्याचा प्रस्ताव सुधाकर बडगुजर यांनी दिला.

सफाई कर्मचारी समायोजन करणार
पूर्व व पश्‍चिम विभागांत खासगीकरणातून रस्त्यांची साफसफाई सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाने या भागातील महापालिकेचे सफाई कर्मचारी हटवून त्यांचे समयोजन सातपूर व सिडको भागांत केल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नगरसेवक राहुल दिवे यांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने ५० टक्के सफाई कर्मचारी हटविण्याच्या सूचना सभापती गणेश गिते यांनी दिल्या.

संपादन : रमेश चौधरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com