करारनाम्याच्या कोट्याप्रमाणे हवे पाणी; पाणीवापर संस्थांकडून जळगाव नेऊरच्या बैठकीत मागणी 

बापूसाहेब वाघ
Monday, 5 October 2020

बैठकीत पाणीवापर संस्थांनी पाणी कोटा किती मिळेल, करारनाम्याप्रमाणे पाणी पूर्ण मिळेल का, सिंचन पाणीवाटपासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध होतील का, मुख्य चाऱ्या व पोटचाऱ्यांची दुरुस्ती होईल का आदी विविध प्रश्न उपस्थित केले. 

नाशिक/मुखेड : महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत नियोजित पाणीवापर संस्था स्थापनेचे ठराव मंजूर करण्यासाठी मंगळवारी (ता.२९) जलसिंचन शाखा जळगाव नेऊर (ता. येवला) येथे पालखेड पाटबंधारे उपविभाग शाखाधिकारी डी. बी. नरोटे, कालवा निरीक्षक ए. एल. थोरात, आर. ई. बोरसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  बैठकीत पाणीवापर संस्थांनी पाणी कोटा किती मिळेल, करारनाम्याप्रमाणे पाणी पूर्ण मिळेल का, सिंचन पाणीवाटपासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध होतील का, मुख्य चाऱ्या व पोटचाऱ्यांची दुरुस्ती होईल का आदी विविध प्रश्न उपस्थित केले. 

बैठकीस १७ सहकारी पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या १७ सहकारी पाणीवापर संस्थांपैकी आठ पाणीवापर संस्थांनी ठराव मंजूर करण्यास सहमती दर्शवली, तर उर्वरित संस्थांनी वरील प्रश्‍न उपस्थित केल्याने नियोजित पाणीवापर संस्था स्थापनेसाठी पालखेड पाटबंधारे विभागाकडून ठरावाची जमवाजमव करण्यास सुरवात झाली. जलसिंचन शाखा, जळगाव नेऊर कार्यक्षेत्रातील वितरिका क्रमांक २७ ते ३२ वरील सहकारी पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. पाणीवापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी करारनाम्याच्या कोट्याप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी शाखाधिकारी श्री. नरोटे यांच्याकडे मागणी करत आग्रह धरला. मल्हारी दराडे, लक्ष्मण गुंड, उत्तम तांबे, दत्तू साळवे, विठ्ठल आहेर, संपत कदम, नानासाहेब कदम, पोपट बोराडे, पोपट शेळके, विकास गायकवाड, देवीदास कदम, अंबादास खुळे, भाऊसाहेब गचाले, उत्तम सोनवणे, श्याम शिंदे, सुरेश वाघ आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा >  गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

कोट्याप्रमाणे पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणीवाटप कसे करावे, यासाठी करारनाम्याच्या कोट्याप्रमाणे पाणी मिळावे. तसेच आहे त्या संस्था जशाच्या तशा नियोजित पाणीवापर संस्थेत सामावून घ्याव्यात. 
-विठ्ठल आहेर, वाहेगाव 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water should be as per the quota of the agreement nashik news