Bharat Band updates : अंबासनला आठवडेबाजार सुरळीतपणे सुरू; भारत बंदचा विसर

ambasan market.jpg
ambasan market.jpg

अंबासन, (जि.नाशिक) : केंद्र सरकारच्या कृषी विद्येयकाविरोधात पुकारलेल्या बंदचा येथील आठवडे बाजारात कुठलाही फरक जाणवला नसल्याने बंदला तिलांजली देत संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. 


येथील आठवडेबाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही सरपंचाच्या वरदहस्तने सुरूच होता. यामुळे जिल्ह्यात गावाची वेगळी ओळख निर्माण झाली. याच काळात माजी सरपंच जितेंद्र आहिरे यांनी सूडबुध्दीने भावांच्या मदतीने बातमीदार दीपक खैरनार यांच्या जीवघेणा हल्ला चढवून ठार मारण्याच्या धमकीची घटना घडली होती. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला होता. यामुळे अंबासन गाव चर्चेत होते. आज मंगळवार (ता.८) केंद्र सरकारच्या कृषी विद्ययेकाविरोधात पुकारलेल्या बंदची आठवण पडल्याचे दिसून आले आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे बाहेरून येणा-या व्यापा-यांनी नेहमीप्रमाणे बाजारपेठेत दुकाने थाटली होती. तर चौकाचौकात संपूर्ण दुकानेही सुरळीतपणे सुरू झाल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. आठवडेबाजारात पूर्वीप्रमाणेच व्यवहार 'जैसे थे' होते. शेतक-यांनी पुकारलेल्या भारत बंदचा जणू विसरच पडल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com