PHOTO :"व्हॉट्‌सऍप ग्रुप फक्त "गुड मॉर्निंग' "गुड नाइट' करण्यासाठी नसतो....तर....".

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

दीड महिन्यापूर्वी बोरगाव येथील चंद्रकांत भरसट यांच्या घराला रात्री शॉर्टसर्किटने आग लागून घर होत्याचे नव्हते झाले. अचानक लागलेल्या आगीने आदिवासी कुटुंब उघड्यावर आल्याने गावातील सामाजिक, जातीय, राजकीय भेदभाव विसरून संकटकाळी मदतीला धावून येतो तोच खरा मित्र,

नाशिक : दीड महिन्यापूर्वी बोरगाव येथील चंद्रकांत भरसट यांच्या घराला रात्री शॉर्टसर्किटने आग लागून घर होत्याचे नव्हते झाले. अचानक लागलेल्या आगीने आदिवासी कुटुंब उघड्यावर आल्याने गावातील सामाजिक, जातीय, राजकीय भेदभाव विसरून संकटकाळी मदतीला धावून येतो तोच खरा मित्र, या उक्तप्रमाणे बोरगाव विचारमंच या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून 71 हजारांची आर्थिक मदत जमा करत ती भरसट कुटुंबास देण्यात आली. 

अशी वेळ कोणावरही येऊ शकते..

ग्रुपचे सदस्य अशोक गवळी, भास्कर भोये, आनंद पडवळ, लक्ष्मण बागूल, स्वप्नील आहेर, विनोद चव्हाण यांनी अशी वेळ कोणावरही येऊ शकते. या कुटुंबाला आपण काय मदत करू शकतो का, अशी पोस्ट ग्रुपवर टाकून मदत करावी, असे आवाहन केले. त्यात बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेले बोरगावचे भूषण भोये, विश्‍वनाथ भोये, शांताराम देशमुख, प्रकाश चौधरी, दिलीप भोये यांनी प्रतिसाद देत चंद्रकांत भरसट यांच्या बॅंकेच्या खात्यावर "फोन पे'च्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर केले. तसेच शबरी ट्रायबल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष तुकाराम कर्डिले, सदस्य डॉ. प्रकाश गायकवाड, राजू कर्डिले यांच्या माध्यमातून 21 हजारांची मदत केली.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

जिल्हा परिषद शाळेतील कृष्ण बागूल व मुलांनी फेरी काढून मदतीचा हात पुढे केला. चंद्रकांत भरसट व पत्नी कल्पना भरसट यांना एकूण 71 हजारांची मदत सुपूर्द केली. व्हॉट्‌सऍप ग्रुपचा सोशल मीडियाचा वापर "गुड मॉर्निंग' "गुड नाइट'पुरताच न करता विधायक कामासाठी करता येतो, असे शबरीचे अध्यक्ष कर्डिले यांनी सांगितले. 

हेही वाचा > PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Via WhatsApp Group Financial help to disaster victims Nashik Marathi News