चिंता करू नका! गरज लागली तर 'या' व्हॉटसऍप हेल्पाइनवर कॉल करा!

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 मार्च 2020

लॉंकडाऊनच्या धर्तीवर पोलीसांनी यापुर्वीच साहायता कक्ष स्थापन केला असून, कर्तव्यावर असलेल्या यंत्रणेची अडवणुक होवू नये यासाठी कक्षातून कामकाज चालत आहे. शहर पोलीस हद्दीत सीआरपीसी 144 (1) (3) प्रमाणे वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जमाव आणि संचारबंदी आदेश लागू झाल्याने वाहन वापर आणि वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवा,जीवनाश्‍यक सेवा यासाठी येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी शहर पोलिसांनी व्हॉंटस्अँप हेल्पलाइन सुरु केली आहे. यासाठी 11 क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत. 

शहर पोलिसांकडून मदतीसाठी व्हॉटसऍप हेल्पाइन 

लॉंकडाऊनच्या धर्तीवर पोलीसांनी यापुर्वीच साहायता कक्ष स्थापन केला असून, कर्तव्यावर असलेल्या यंत्रणेची अडवणुक होवू नये यासाठी कक्षातून कामकाज चालत आहे. शहर पोलीस हद्दीत सीआरपीसी 144 (1) (3) प्रमाणे वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशातून पोलीस,आरोग्य,अत्यावश्‍यक सेवा व जीवनावश्‍यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन आदी यंत्रणांच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळण्यात आले असले तरी संबधीतांना जीवनावश्‍यक आणि अन्य आवश्‍यक सेवा बजावत असतांना त्रास होवू नये. तसेच संपर्कात अडचणी येऊ नये यासाठी आता व्हॉंटस्अँप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहेत. 

No photo description available.

हेही वाचा >PHOTOS : "बापरे! जर्मन नागरिकांचे नाशिकमध्ये काय काम?" नागरिकांमध्ये अचानक खळबळ
.. 
हे आहेत मदतीसाठीचे व्हॉटसऍप क्रमांक 
7058946877 
9373800019 
7248903877 
7709295534 
7020583176 
7248906877 
9403165132 
9403165140 
8485810477 
7248922877 
7350166999 
0253-2971233 (औद्योगिक परवानगीकरिता) 
http://corona.nashikcitypolice.gov.in (ऑनलाईन फॉर्म)  

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp helpline for help from Nashik city police marathi news