कोरोना पॉझिटिव्ह असूनही आयुक्तांचा जज्बा कायम! शहर कोरोनामुक्त करण्याचा निश्‍चय

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 15 May 2020

व्यायाम झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जोमाने काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधी व शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक / मालेगाव : महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहर हादरले. आयुक्त होम आयसोलेशन असतानाही निवासस्थानातून त्यांचे कामकाज सुरू आहे. त्यांचा आत्मविश्‍वास तसूभरही कमी झालेला नाही. 50 सूर्यनमस्कार घातले, व्यायाम केला. शहर कोरोनामुक्त करण्याचा निश्‍यच त्यांनी व्यक्त केला. 

मालेगाव शहर कोरोनामुक्त करण्याचा निश्‍चय 
कासार म्हणाले, की शहरात कोरोनाबाधित, संशयित अशा सर्व रुग्णांवर उपचारासाठी 12 केंद्र आहेत. देखरेख व सुविधांसाठी 12 अधिकारी नियुक्त केले आहेत. सर्व सुरळीत काम करीत असल्याने रुग्णांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. आपण स्वतः म्हाळदे, फरान, जीवन, मसगा, मालेगाव हायस्कूल, हज हाउस येथील सोयी-सुविधांची जातीने पाहणी केली. जीवन हॉस्पिटलचे नूतनीकरण सुरू आहे. सर्व सुविधांसह ते लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. 

Image may contain: Pramod Hindurao

हेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का! 

होम आयसोलेशनमध्येही आयुक्तांचे काम सुरू 
शुक्रवारी व्यायाम झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जोमाने काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधी व शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक चित्र! माऊलीच्या पायाला जखमा.. पोळले तळवे.. पण बाळाला दारिद्रयाचे चटके नको!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While home isolation malegaon Municipal Commissioner's work started nashik marathi news