....अन् चक्क एका पायावर "त्याने" गाठले निफाड! 

माणिक देसाई : सकाळ वृतसेवा 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

गेल्या वर्षी पायात पतंगाचा मांजा अडकल्याने जखमी झालेला 'हा" यंदाही अचानक आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र निफाडचे राहुल वडघुले यांनी त्याचे जवळील छायाचित्र टिपले, तेव्हा गेल्या वर्षी मांजामध्ये अडकल्याने त्याच्या पायाचा पंजा आता पूर्णपणे तुटलेला आढळला. त्यामुळे एका पंजावरच शरीराचा भार सांभाळताना त्याला होणार त्रास जाणवत असल्याचे दिसत होते.

नाशिक : हिवाळा म्हटलं, की आपल्याकडे अनेक पक्षी स्थलांतर करून येतात. त्यात प्रामुख्याने क्रेन, वागतेल, फ्लेमिंगो, अनेक प्रकारचे डक, स्टील्ट, फाल्कन, नीलकंठ, रोझी स्टर्लिंग, पेलिकन, गोडवीत, रफ, सांडपायपेर अशा अनेक पक्ष्यांचा समावेश होतो. 

त्यात एक मुख्य संकट म्हणजे पतंग आणि त्याचा मांजा.

उत्तर गोलार्धात थंडी वाढली, की हे पक्षी आपल्याकडे काही काळासाठी येतात, रमतात आणि आपल्यासाठी बऱ्याच आठवणी सोडून परत जातात. मात्र हे पक्षी जेव्हा आपल्याकडे इतक्‍या दुरून येतात, तेव्हा अनेक संकटांचा सामना करतात. त्यात एक मुख्य संकट म्हणजे पतंग आणि त्याचा मांजा. अनेक पक्ष्यांना यामुळे आपला जीव गमवावा लागतो किंवा अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. यापैकी एक पक्षी म्हणजे पांढरा वाकटेल किंवा पांढरा धोबी. मूळचा यूरोप आणि रशियन भागात आढळणारा हा पक्षी हिवाळ्यात आपल्याकडे स्थलांतर करतो. 

मांजात अडकून जखमी पांढरा धोबी पक्ष्याचे यंदाही दर्शन 

गेल्या वर्षी पायात पतंगाचा मांजा अडकल्याने जखमी झालेला हा पक्षी यंदाही अचानक आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र निफाडचे पक्षीमित्र राहुल वडघुले यांनी त्याचे जवळील छायाचित्र टिपले, तेव्हा गेल्या वर्षी मांजामध्ये अडकल्याने त्याच्या पायाचा पंजा आता पूर्णपणे तुटलेला आढळला. त्यामुळे एका पंजावरच शरीराचा भार सांभाळताना त्याला होणार त्रास जाणवत असल्याचे दिसत होते. असे असले तरी लाखो किलोमीटरचा प्रवास एका पंजावर करून निफाड तालुक्‍यात दाखल झालेला हा पक्षी जीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता पुढे गेले पाहिजे, असाच संदेश तर देत नसेल ना, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

 PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

निसर्गाचे रक्षण सर्वांनी मिळून केले पाहिजे
पतंगाच्या नायलॉन मांजावर बंदी असूनही ते सर्रासपणे विकले जातात आणि लोक त्यांचा वापर करतात. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पालकांनीही मुलांना असा मांजा वापरण्याला विरोध करायला हवा. निसर्गाचे रक्षण आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे. - राहुल वडघुले, पक्षी निरीक्षक, निफाड 

मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The white washed bird appears in Niphad Nashik Marathi news