esakal | धक्कादायक! मालेगावात चक्क WHO चे डॉक्टरच कोरोना पॉझिटिव्ह..
sakal

बोलून बातमी शोधा

corona test 1.jpg

मालेगावची स्थिती गंभीर बनत असून आलेल्या अहवालात पोलिस दलातील तीन जवानांचा, तर राज्य राखीव दलाच्या एकाचा समावेश आहे. तिघा डाॅक्टरांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्युएचओ) येथील काम पाहत असलेल्या डाॅक्टरचा तसेच अपर पोलिस अधिक्षक कार्यालयातील सहाय्यक निरीक्षकाचा समावेश आहे

धक्कादायक! मालेगावात चक्क WHO चे डॉक्टरच कोरोना पॉझिटिव्ह..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : मालेगावात रविवारी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर रविवारी (ता.४) रात्री प्राप्त झालेले ५२ अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये कोरोनाग्रस्तांचे शतक रोखण्यासाठी प्रशासन धडपड करीत होते. त्या मालेगाव शहरातील बाधितांची संख्या तीनशेवर गेली आहे. गंभीर म्हणजे आता बंदोबस्त व उपचार करणारे कर्मचारी पॉझिटिव्ह येत आहेत. रविवारी तीन डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे काम करीत असलेल्या डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवार ठरला घातक
मालेगाव शहरासाठी रविवार अक्षरशः घातवार ठरला. मालेगावात नवीन २७ कोरोना पाँझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तसेच सात संशयीतांचा म्रुत्यु झाला. शहरातील कोरोना बाधितांनी सव्वातीनशेचा टप्पा गाठला आहे. शहरासाठी रविवार घातवार ठरला. रात्री सात कोरोना संशयीतांचा म्रुत्यु झाली. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात २७ पॉझिटिव्ह आले. यात तीन डाँक्टरांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या यापूर्वीच्या दहा रूग्णांचे अहवालही पाँझिटिव्ह आले आहेत. पश्चिम भागात कोरोनाचा शिरकाव सुरूच आहे. 
मालेगावची स्थिती बनतेय गंभीरआलेल्या अहवालात पोलिस दलातील तीन जवानांचा, तर राज्य राखीव दलाच्या एकाचा समावेश आहे. तिघा डाॅक्टरांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्युएचओ) येथील काम पाहत असलेल्या डाॅक्टरचा तसेच अपर पोलिस अधिक्षक कार्यालयातील सहाय्यक निरीक्षकाचा समावेश आहे. संगमेश्वर भागातील पीठगिरणी चालकाला कोरोनाची बाधा झाली आहे. कालपर्यंत ही गिरणी सुरू होती. यामुळे किती जण संक्रमित झाले असतील याबद्दल मोठी चिंता आहे. तसेच नूरबाग भागातील एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे. राज्यातील हाॅटस्पाँट झालेल्या मालेगावची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. 

प्रशासनाची वाढली डोकेदुखी
आतापर्यंत १५ जणांचा तर ४७ संशयीतांचा म्रुत्यु झाला आहे. रात्री जीवन हाॅस्पीटल मध्ये सहा तर म्हाळदे घरकुल उपचार केंद्रात एक अशा सात संशयीतांचा म्रुत्यु झाला. त्यांचे अहवाल प्रलंबीत आहे.  शहरात एक मे रोजी १६, दोन मे रोजी २४  व ३ मेस २७ अशा तीनच दिवसात ६७ कोरोना पाॅझिटिव्ह मिळून आले. सध्या रोज वीसच्या संख्येने रूग्ण वाढत आहेत. दाभाडीतील बाधित रूग्णही डाॅक्टर आहे. या स्थितीचा अंदाज घेऊन प्रशासन अतिशय सजग झाले आहे. त्यांनी यासंदर्भात पुढील उपचारांची तयारी ठेवली आहे. 

हेही वाचा > कोरोनाची धडक थेट शेतकऱ्याच्या बांधावरच!...चांदवडला पुन्हा एक पॉझिटिव्ह

मालेगावची स्थिती नियंत्रणात आणण्यावर प्रशासनाचा भर
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वीस डॉक्टर्स आणि चोवीस परिचारीका मालेगावला नियुक्त केल्या आहेत. गरज पडल्यास शेजारच्या जिल्ह्यांतून वैद्यकीय कर्मचारी नियुक्त करण्याच्या सुचना सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मालेगावशी कनेक्शन असलेल्या बाधितांचा आढावा घेतला. येवला येथेही बैठक घेतली. मालेगावची स्थिती नियंत्रणात आणण्यावर प्रशासनाचा भर आहे. 

हेही वाचा > लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना
"

go to top