अवघ्या जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या 'आंब्या'ची निर्यात थांबणार?

mango-hapus.jpg
mango-hapus.jpg

नाशिक : (लासलगाव) कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा या वर्षी अमेरिका व ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया

गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे. मागील वर्षी 10 एप्रिलपासून आंब्याची निर्यात लासलगावमार्गे सुरू झाली होती. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या आंब्याची अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला वारी सुरू झाली होती. येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या विकिरण प्रकल्पात प्रक्रिया करून काही वर्षांपासून अमेरिकेत आंब्याची निर्यात सुरू आहे. ऑस्ट्रेलियन मार्केटमध्येही त्याची सुरवात झाली होती. दर वर्षी साधारणत: एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. 

अनेक वर्षांपासून कृषकच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडली जात होती. भाभा अणुसंशोधन केंद्राशी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या ऍग्रो सर्च या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com