सिनेस्टाईल! व्हॉट्‌सऍपवरून फोटो पाठवताच अवघ्या ३० मिनिटातच खेळ संपला!

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

लक्ष्मीबाई मेदगे (54, रा. दसक बसथांब्याजवळ) बुधवारी (ता. 12) दुपारी दोनच्या सुमारास रुग्णालयातून रिक्षातून सैलानीबाबा दर्ग्याजवळ उतरल्या. तेथून त्या पायी घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी श्रीमती मेदगे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठन खेचून पोबारा केला. उपनगर पोलिस माहिती मिळताच घटनास्थळी पोचले. त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दोघे संशयित कैद झाल्याने पोलिसांनी ते फोटो पोलिसांच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. त्याचवेळी,

नाशिक : जेल रोड परिसरात रिक्षातून उतरून घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेचून नेले. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविल्याने, जयभवानी रोडवर गस्तीवर असलेल्या दोन बिटमार्शलला घटनेतील दुचाकी दिसली. दुचाकी निरखून पाहत असतानाच तेच दोघे संशयित पळू लागल्याने त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू झाला आणि नागरिकांच्या मदतीने दोघांना जेरबंद करण्यात आले. 

अशी घडली घटना....

जेल रोड परिसरात राहणाऱ्या लक्ष्मीबाई मेदगे (54, रा. दसक बसथांब्याजवळ) बुधवारी (ता. 12) दुपारी दोनच्या सुमारास रुग्णालयातून रिक्षातून सैलानीबाबा दर्ग्याजवळ उतरल्या. तेथून त्या पायी घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी श्रीमती मेदगे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठन खेचून पोबारा केला. उपनगर पोलिस माहिती मिळताच घटनास्थळी पोचले. त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दोघे संशयित कैद झाल्याने पोलिसांनी ते फोटो पोलिसांच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. त्याचवेळी, उपनगर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस नाईक समीर चंद्रमोरे व दिनेश महाजन जयभवानी रोडवर दुचाकीवरून गस्त घालत होते. त्यांनाही दोन संशयितांचे फोटो मिळाले. निसर्गोपचार केंद्रामागे त्यांना जेल रोडच्या सोनसाखळी चोरीशी साधर्म्य असलेली दुचाकी उभी केलेली दिसली. त्या दुचाकीची ते पाहणी करीत असताना, जवळच बसलेले दोन संशयित अचानक पळताना त्यांना दिसले. बिटमार्शल चंद्रमोरे व महाजन यांनीही त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

त्यावेळी ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आली..अन् मग....

संशयित नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षात बसले. बीट मार्शल चंद्रमोरे व महाजन दोघेही रिक्षाच्या मागे धावत होते. मात्र काही अंतरावर रिक्षा थांबल्यानंतर चोरट्यांनी रिक्षातून उतरून पळ काढला. त्या वेळी ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी संशयितांच्या मागे धावत दोघांना पकडले. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले व पोलिसांनी संशयितांना उपनगर पोलिस ठाण्यात आणले. गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटीलही पोलिस ठाण्यात पोचले. विक्रमजित सिंग अमरजित सिंग आणि अवतारदर्शन सिंग अशी चोरट्यांची नावे असून, याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयितांकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्‍यता असून, त्यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.  
हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within thirty minutes chain snatchers arrested by nashik police Nashik Crime Marathi News