VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?

केशव मते 
Thursday, 3 September 2020

वेळ दुपारी बारा वाजताची...नाशिकचा द्वारका परिसर सदैव वाहनांच्या वर्दळीने भरलेला..अशातच तुम्हाला जर भरलेल्या गर्दीत मुंडकं नसलेला व्यक्ती गाडी चालविताना दिसला तर तुम्ही काय कराल? अशा पद्धतीचा विचित्र आणि भयानक प्रकार पाहून एखादा व्यक्ती भीतीपोटी पळून तरी जाईल नाहीतर त्याला तेथेच चक्कर येईल हे खरे.

नाशिक : वेळ दुपारी बारा वाजताची...नाशिकचा द्वारका परिसर सदैव वाहनांच्या वर्दळीने भरलेला..अशातच तुम्हाला जर भरलेल्या गर्दीत मुंडकं नसलेला व्यक्ती गाडी चालविताना दिसला तर तुम्ही काय कराल? अशा पद्धतीचा विचित्र आणि भयानक प्रकार पाहून एखादा व्यक्ती भीतीपोटी पळून तरी जाईल नाहीतर त्याला तेथेच चक्कर येईल हे खरे. सध्या नाशिकच्या द्वारका परिसरात मुंडके नसलेला माणूस दुचाकी चालवताना दिसला आणि लोकांची भंबेरीच उडाली.  भर गर्दीमध्ये एक व्यक्ती त्याला मुंडकं नसलेल्या स्थितीत गाडी चालवत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पहिल्यांदाच असा प्रकार पाहून नाशिककरांना थोडं विचित्रच वाटलं.

खुद्द डोळ्यादेखत मुंडकं नसलेला व्यक्ती गाडी चालवत फिरतोय

आपण चित्रपट किंवा एखाद्या पुस्तकात मुंडकं नसलेल्या व्यक्तीचा उल्लेख केलेला पाहतो. तसेच सोशल मीडियात मुंडकं नसलेला व्यक्ती, झॉंबी किंवा भुतांचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र सध्या खुद्द डोळ्यादेखत मुंडकं नसलेला व्यक्ती गाडी चालवत फिरतोय आणि एवढा विचित्र आहे की तो आपण पाहूच शकत नाही. पण त्यानंतर त्यामागचं सत्य उघडकीस आलं. काय होता नेमका प्रकार..

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

मला डोकं नाही..मी हेल्मेट वापरत नाही..!
नाशिक शहरात विनाहेल्मेट जाणाऱ्या वाहनचालकांना हा मुंडके नसलेला वाहनचालक पुष्पगुच्छ देऊन हेम्लेट वापरण्यास सांगत आहे. नाशिक शहर पोलिसाकडून हेम्लेट वापराविषयी अनोखी जनजागृती केली जात आहे. "मला डोकं नाही..मी हेल्मेट वापरत नाही..!" मुंडकं नसलेल्या व्यक्ती जणू आपल्याला एक संदेश देत आहे की हेल्मट वापरणे आपल्यासाठी किती बंधनकारक आहे. सकाळच्या वेळी असे दृश्य पाहून नाशिककरांना धक्का बसला खरा..पण त्यानंतर खुलासा झाल्याने त्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. हेल्मेट वापरण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागातर्फे विविध युक्त्या लढविल्या जात आहेत. 

हेही वाचा >  धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without head man driving bike at nashik marathi news