प्रॉपर्टीचा वाद...दीर व दोन भावजईंनी भररस्त्यात महिलेसोबत केला 'असा' प्रकार.

woman on road 1.jpg
woman on road 1.jpg

नाशिक / सातपूर : एका चाळमध्ये महिला राहते. त्याच चाळीत दीर व दोन भावजय राहतात. काही दिवसांपासून चव्हाण कुटुंबात संपत्तीवरून वाद होत आहेत. त्या महिलेवरून त्यांच्यात नेहमीच भांडण होत असे. एके दिवशी त्या महिलेसोबत दीर अन् भावजयने मिळून केला धक्कादायक प्रकार..

असा घडला प्रकार

स्वामी समर्थ चौकातील चव्हाण चाळमध्ये रंजना मनोज चव्हाण राहतात. त्याच चाळीत किशोर ऊर्फ संजय चव्हाण, मनीषा संजय चव्हाण व प्रेरणा संजय चव्हाण राहतात. काही दिवसांपासून चव्हाण कुटुंबात संपत्तीवरून वाद होत आहेत. रंजना यांच्यावरून त्यांच्यात नेहमीच भांडण होत असे. कामानिमित्ताने रंजना गुरुवारी घरातून बाहेर जात असताना प्रेरणा, मनीषा व किशोर यांनी संगनमत करून रंजना यांना दांडक्‍याने मारहाण केली. ठार मारणार असे सांगून किशोरने विनयभंग केला. रंजना यांच्या फिर्यादीवरून दीर व भावाजई अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल

मालमत्तेच्या वादातून दीर व दोन भावजईंनी महिलेला भररस्त्यात दांडक्‍याने मारहाण केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com